भुसावळ (प्रतिनिधी )-
स्वयंचलन अर्थात ऑटोमेशन ही उद्योगांसाठीची महत्वाची बाब म्हणून समोर येते आहे. शक्य होईल तेवढे माणसांचा वापर कमी करत निर्मिती आणि प्रक्रिया ह्या उद्योगण बरोबरीनेच वैद्यकीय आणि जटिल भूभागतील कामांसाठी सुद्धा रोबॉट्सचा वापर वाढतोय. परिवहन, परीचालन, रसद पुरवठा, क्लिष्ट बाबी हाताळत मानवाला कठीण परिस्थितीत सुयोग्य निर्णायसाठी मदत करणे ह्या प्रत्येक क्षेत्र रोबोटिक्स तंत्रज्ञानाने व्यापात चालले आहे. भारतातीलच नाही तर जगातील सगळ्यात उदयोन्मुख क्षेत्र म्हणून आज रोबोटिक्स तंत्रज्ञानकडे पहिले जात आहे असे प्रतिपादन श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित चर्चा सत्रात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर. पी. सिंह यांनी केले.
रोबॉट्सची बांधणी, रोबॉट्सची प्रोग्राममिंग, सुटे भाग, रोबॉट्सच उपयोजित वापर, वेग वेगळ्या गरजांप्रमाणे रोबॉट्सची डिजाइन, अश्या अनेक क्षेत्रात आपण आपले करियर करू शकतो. वैद्यकीय, शिक्षण, व्यवस्थापन, प्रक्रिया, संरक्षण, मोटर वाहन उदयाग अशा प्रत्येक क्षेत्रात रोबोटिक्स तंत्रज्ञाच्या माध्यमातून विद्यार्थी आपले करियर करू शकतात. ‘रोबोटिक्स’ तंत्रज्ञानाचा झपाट्याने विकास होत आहे. ‘रोबोटिक्स’ तंत्रज्ञांना मागील मुख्य उद्देश म्हणजे रोबॉट्सला निर्णय क्षमता प्रदान करणे आणि मानवाप्रमाणे अचूक विचार करत योग्य निर्णय घेण्याची कुवत इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानाच्या संयोगातून रोबोट्स अर्थात यांत्रिक मानवात निर्माण करून त्यात मावनासारखी बुध्दी उतरवून त्याच्याकडून समस्या सोडवून घेणे होय असेही डॉ.सिंह म्हणाले.
चर्चासत्रात महाविद्यालयाचे डीन डॉ.राहुल बारजिभे, डॉ.गिरीष कुलकर्णी, प्रा.अनंत भिडे, प्रा. धिरज अग्रवाल व मान्यवर उपस्थित होते.
जगात आज ह्या क्षेत्रात प्रचंड वेगाने संशोधन होऊन राहिले आहे आणि मानवाच्या बऱ्याच जटिल समस्यांना रोबोटिक्स तंत्रज्ञान उपकारक ठरत आहे. देशातील अनेक नामांकित व अद्ययावत रुग्णालयांमध्ये रोबोट्सद्वारे अचूक रोबोटिक सर्जरी होत असून त्याचा लाभ रुग्णांना मिळत आहे. रोबॉट्स व मानवामधील तांत्रिक नाही तर मानसिक बांध सुद्धा गाढ होत असून रोबॉट्सच्या अचूकतेवरील विश्वास वाढत चालला आहे. रोबोटिक्सची पदवी प्राप्त करून रोबोटिक हेल्थकेअर ह्या अत्यंत वेगाने आणि प्रचंड मागणी असणाऱ्या क्षेत्रात एक सुंदर करियर मूल आणि मुली करू शकतात असे मार्गदर्शन डॉ.राहुल बारजिभे यांनी केले.
निरीक्षण, डाटा कलेक्शन, सुटे भाग जुळणी ह्या कमांच्या पुढे जात निर्णय प्रक्रियेत सहभागी होणारे रोबॉट्स तंत्रज्ञातील अफाट प्रगती दर्शवतात. येणाऱ्या काळात यंत्र स्वरूपच नाही तर हुबेहूब माणसांसारखे दिसणारे आणि संवाद साधू शकणारे रोबॉट्स अस्तीत्वात आणण्याचे काम इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानाच्या मधायमातून साकारत आहे. अण्यांत प्रचंड संधि असणाऱ्या ह्या क्षेत्राने आता भारतातही बाळसे धरला सुरुवात केली असून प्रचंड संधि मग त्या शैक्षणिक असतील, रोजगाराच्या असतील किंवा संशोधनाच्या, येणाऱ्या प्रत्येक संधीचे सोने करण्यासाठी भारतीयांनी तयार रहावयाचे आहे असे डॉ.गिरीष कुलकर्णी म्हणाले.



