वीज ग्राहकांची ऑनलाईन पद्धतीने हजारो रुपयांची बिले दुरुस्त ; संचारबंदी शिथिल झाल्यावर व्यापाऱ्यांनी संपर्क साधण्याचे प्रा.धिरज पाटील यांचे आवाहन


भुसावळ (प्रतिनिधी )-
२२ मार्चपासून जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर झाले. वीज वितरण कंपनीने तीन महिन्याचे बिल एकाच वेळेस पाठविले. तेव्हापासून जूनपर्यंत ग्राहकांना विजेचे बिल घरपोच मिळालेच नाही. या काळात ग्राहकांनी स्वत: रिडींग करून वीज वितरण कंपनीला कळवावे असे आवाहन वीज कंपनीने केले होते. प्रत्यक्षात कंपनीचा हा संदेश प्रत्येक ग्राहकापर्यंत पोहोचला नाही. अनेकांना हे रिडींग करायचे कसे याचा अंदाजच आला नाही. यामुळे मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्याचे बिल जून अखेर ग्राहकांना मिळाले. जे बिल ५०० ते हजार रुपयाचे होते, ते बिल ग्राहकांना चार ते पाच हजारांच्या घरात मिळाले आहे.
प्रत्यक्षात ग्राहकाने ही वीज वापरली नव्हती, असे म्हणत ग्राहकांनी आम्हाला वाढीव बिल थोपविण्यात आल्याचा आरोप केला आहे. कोरोना काळात गर्दी नियंत्रित करण्यासाठी वारंवार सूचना दिल्या जात आहे. मात्र वीज कंपनी कार्यालयात प्रचंड गर्दी वाढली होती. यातून कोरोना सारखा आजार पसरण्याचाही धोका आहे. कंपनीकडून ग्राहकांना सुविधा मिळावी व तक्रार जाणून घ्यावी यासाठी शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धिरज पाटील व महावितरणचे अधिकारी यांनी गुगल मीटच्या माध्यमातून ग्राहकांच्या तक्रारी ऑनलाईन पद्धतीने सोडवल्या आहेत.
हजारो रुपयांची बिले दुरुस्त:
शिवसेनेचे प्रा.धिरज पाटील यांनी ग्राहकांच्या वतीने तक्रारी मांडल्या होत्या त्याअनुषंगाने महावितरणचे अधिकारी आणि ग्राहक यांच्याशी थेट चर्चा करीत अनेक ग्राहकांची देयके दुरुस्त करण्यात आली. श्रीनगर येथील अनिल गोविंदा लोखंडे यांचे ८४०० रुपये तर भुसावळ हायस्कूलजवळील नीरज तिवारी यांचे ६२८९, मंगल पाटील यांचे ३२१७ अशी रक्कम बिलातून कमी करून दुरुस्त करण्यात आली. गणेश कॉलनी, खळवाडी, रेल दुनिया, हुडको कॉलनी, अयोध्या नगर व भोईनगर परिसरातील ग्राहकांच्या तक्रारीसुद्धा मांडणार असून प्रत्येक ग्राहकाला न्याय देण्याचा प्रयत्न असेल असे प्रा.धिरज पाटील यांनी सांगितले.

संचारबंदीनंतर व्यापाऱ्यांनी संपर्क साधावा
स्थिर आकार माफ करण्याची मागणी शिवसेनेने केली होती त्यामुळे तीन महिन्यात प्रत्येक व्यावसायिकांना १२०९ रुपयांचा फायदा झाला. मात्र, कोरोनामुळे सर्व कामधंदे बंद असल्याने हे बिल कोठून भरायचे? असा प्रश्न व्यापाऱ्यांना पडला आहे. व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शिवसेना प्रत्यनशील राहील म्हणून व्यापाऱ्यांनी शहरातील संचारबंदी शिथिल झाल्यावर संपर्क साधण्याचे आवाहन शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धिरज पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *