पत्रकार एकता फाउंडेशनमध्ये जळगाव जिल्ह्याची नवी टीम! जिल्हाध्यक्षपदी जोहेब सैय्यद, तर जिल्हा सचिवपदी मयूर निंभोरे यांची नियुक्ती!
राष्ट्रीय अध्यक्ष तोशेष लक्ष्मीपती शुक्ला यांच्याकडून महत्त्वाच्या जबाबदाऱ्या; पत्रकारांचे हक्क, न्याय आणि समस्यांसाठी संघटितपणे काम करण्याची संधी



 भुसावळ ( प्रतिनिधी )-

पत्रकारांचे हक्क, न्याय आणि त्यांच्या विविध समस्यांना वाचा फोडण्यासाठी कार्यरत असलेल्या पत्रकार एकता फाउंडेशन या राष्ट्रीय संघटनेच्या जळगाव जिल्ह्यातील संघटनात्मक जबाबदाऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे. भुसावळ येथील पत्रकार जोहेब रमजान सैय्यद यांची जिल्हाध्यक्षपदी, तर मयूर निंभोरे यांची जिल्हा सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तोषेष लक्ष्मीपती शुक्ला यांनी या नियुक्त्या केल्या असून, दोघांवरही जिल्ह्यात संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
 जिल्हाध्यक्षपदी जोहेब सैय्यद; पत्रकारांच्या प्रश्नांसाठी नेतृत्वाची जबाबदारी

 पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर जळगाव जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पत्रकारांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविणे, त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठविणे आणि पत्रकारांना संघटित व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे, ही त्यांच्या भूमिकेतील महत्त्वाची उद्दिष्टे असणार आहेत.

पत्रकारिता करताना पत्रकारांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत पत्रकारांच्या पाठीशी संघटित ताकद उभी करणे, त्यांच्या प्रश्नांचा पाठपुरावा करणे आणि अन्यायाविरोधात लोकशाही मार्गाने आवाज उठविण्यासाठी प्रयत्न करनार, असल्याचे जिल्हाध्यक्ष  जोहेब सैय्यद यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.

तर जिल्हा सचिवपदी मयूर निंभोरेयांचेवर संघटनात्मक कामकाजाची महत्त्वाची धुरा सोपविण्यात आली असून . जिल्ह्यातील संघटनेचे कामकाज समन्वयाने पुढे नेणे, संघटनात्मक उपक्रमांना चालना देणे आणि पत्रकारांच्या प्रश्नांवर एकत्रितपणे काम करण्यासाठी आवश्यक समन्वय साधणे, आदी कार्य करणार आहे.

जिल्हाध्यक्ष जोहेब सैय्यद आणि जिल्हा सचिव मयूर निंभोरे यांच्या नियुक्त्यांमुळे जळगाव जिल्ह्यात संघटनेचे कार्य अधिक व्यापक करण्यासाठी प्रयत्नांना दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.जळगाव जिल्हाध्यक्षपदी जोहेब रमजान सैय्यद आणि जिल्हा सचिवपदी मयूर निंभोरे यांची नियुक्ती झाल्याबद्दल पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.