किनगावात पथसंचलनाच्या वादाला हिंसक वळण; १०० हून अधिक जणांवर गुन्हा ! दगडफेकीत पोलीस उपनिरीक्षकासह सात जण जखमी ; १६ जणांना अटक ;

    यावल (प्रतिनिधी )– यावल तालुक्यातील किनगाव येथे विजयादशमीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाला एका धार्मिक स्थळासमोरून जाण्यास विरोध झाल्यानंतर तणाव निर्माण झाला. यावेळी झालेल्या दगडफेकीत पोलीस उपनिरीक्षकासह सात जण जखमी झाले. या प्रकरणी यावल पोलिसांनी १०० हून अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, १६ जणांना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, किनगाव येथील चुंचाळे रोडवरील एका धार्मिक स्थळासमोरून दसऱ्याचे दिवशी पथसंचलन नेण्यास विरोध करण्यात आला. यावेळी रस्ता अडवण्यात आल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली. जमावाला रस्त्यावरून हटवण्याच्या प्रयत्नादरम्यान दगडफेक झाल्याची माहिती आहे. या घटनेत पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन यांच्यासह सात जण जखमी झाले.पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात १०० हून अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
     या प्रकरणात हारुण नसिर पिंजारी, अक्षय संतोष साळुंखे, भूषण शिवाजी साळुंखे, इरफानही 
गावात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, उपविभागीय पोलीस अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे पुढील तपास करीत आहेत.