ललवानी ॲग्रो टुरिझम व मनजीया रेस्टॉरंट तर्फे शिक्षक दिन साजरा ; किडस गुरुकुल व किडस नेस्टस च्या संस्थापक व शिक्षकांचा गौरव ;

भुसावळ-(प्रतिनिधी)- येथून जवळच असलेल्या ललवाणी ऍग्रो टुरिझम व मनजीया रेस्टॉरंट तर्फे  भारताचे माजी राष्ट्रपती, थोर तत्वचिंतक व महान शिक्षण तज्ञ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त पाच सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो या दिनाचे औचित्य साधून भुसावळ येथील किड्स गुरुकुल इंटरनॅशनल व कुऱ्हा पानाचे येथील किड्स नेस्ट या शाळेतील सर्व शिक्षकांचा सत्कार व सन्मान निसर्गाच्या सानिध्यात व मनमोकळ्या वातावरणात मनजिया रेस्टॉरंटच्या प्रांगणात करण्यात आला. याप्रसंगी ललवानी फाउंडेशनचे अध्यक्ष व कोटेचा महिला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य प्रा.डाॅ.डि. एम ललवाणी यांनी शिक्षक हा विद्यार्थी घडवण्यात नव्हे तर राष्ट्र घडविण्यात सुद्धा महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो. कारण आजचे विद्यार्थी हे उद्याचे भारताचे भविष्य आहेत आणि म्हणून भारताचे भविष्य घडवण्यामध्ये शिक्षकांची महत्त्वपूर्ण भूमिका असते असे नमूद केले .तसेच शिक्षक हा ज्याप्रमाणे कुंभार हा मातीच्या गोळ्याला आकार देतो व सुंदर वस्तू निर्माण करतो त्याचप्रमाणे शिक्षक हा सुद्धा मातीच्या गोळ्या रुपी लहान बालकाला आकार देऊन त्याला सुसंस्कारी ,सुशिक्षित व सक्षम बनवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात .या दोन्ही शाळेमधील शिक्षकांचा सत्कार प्रसंगी किड्स गुरुकुल ग्रुप भुसावळ चे संस्थाचालक अनिल कोटेचा तसेच प्रमोद  जैन तसेच किड्स नेस्ट च्या संस्थापिका व मुख्याध्यापिका सौ. पूनम फलक यांचा सुद्धा  सन्मान करण्यात आला.

 या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे संस्था चालकांच्या समवेत सर्व शिक्षकांनी  स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. तसेच सर्व शिक्षकांनी या निसर्गरम्य वातावरणाचा,वनराईचा, गोशाळा, ट्रॅक्टर शिवार फेरी, इंडोर गेम्स, आउटडोर गेम्स या सर्वांचा मनमुराद आनंद लुटला.  संस्थाचालकांमुळे आजचा दिवस आमचा संस्मरणीय ठरला असे प्रतिपादन केले .

किड्स गुरुकुलच्या मुख्याध्यापिका डॉली स्वामी यांनी ललवाणी ऍग्रो टुरिझम व मनजीया रेस्टॉरंट बद्दल गौरवोदगार काढून  भुसावळ व आसपासच्या परिसरातील गोप्रेमी, निसर्गप्रेमी व खवय्या प्रेमी यांच्यासाठी फारच सुंदर रमणीय सोय उपलब्ध करून दिली व जो सर्व शिक्षकांप्रती एका शिक्षकाने दाखवलेला जिव्हाळा याबद्दल प्रा.डाॅ.डी .एम. ललवाणी यांचे आभार व्यक्त केले .किडस नेस्ट च्या सौ.पुनम फालक यांनी प्रा.ललवाणी यांना प्राईड आॅफ भारत व अॅग्रो टुरीझमला बेस्ट स्टार्टअप पुरस्कार मिळाल्या बद्दल अभीनंदन करुन सर्व शिक्षकाप्रती आदरभाव केल्याने आभार मानले.

कर्मचारी सौ गायत्री जगताप ,सौ मंदा तोरे, ईश्वर तोरे, महेश जगताप, अप्पा जगताप, सखाराम बारेला, रेस्टॉरंट चे आचारी मयूर महाजन यांनी हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.