दुःखद निधन ;

ईशान योगेश मांडे (वय २२) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन : 
जळगाव : येथील ईशान योगेश मांडे (वय २२) यांचे आज, शुक्रवार दि. २८ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री नाशिक येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

ते योगेश मांडे यांचे सुपुत्र तसेच महेश मांडे (लोकमत, नाशिक) यांचे पुतणे होते.

त्यांची अंत्ययात्रा उद्या, शनिवार दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२ वाजता जुनी पोस्टल कॉलनी, एम. जे. कॉलेजच्या मागे, जळगाव येथून निघणार आहे.

ईशान मांडे यांच्या अकाली निधनाने मांडे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.