भुसावळ (प्रतिनिधी )-: गणेशोत्सवाच्या काळात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती व विविध सजावटीच्या माध्यमातून पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अंतर्नाद प्रतिष्ठान, भुसावळ व दिव्य मराठी यांच्यातर्फे सलग ६ व्या वर्षी नि:शुल्क शाडूमाती गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. “शाडूमातीचा गणपती बनवूया व पर्यावरणाचे रक्षण करूया” हा संदेश देत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कार्यशाळेत सहभागी विद्यार्थी स्वतःच्या हाताने शाडूमातीची गणेशमूर्ती तयार करून ती सुंदर रंगवतील व त्याच मूर्तीची घरामध्ये स्थापना करतील. पर्यावरण रक्षणासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. शाडूमातीचा गणपती बनवूया व पर्यावरणाचे रक्षण करूया” हा संदेश देत विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम ही कार्यशाळा शनिवार, दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत लोणारी समाज मंगल कार्यालय, रिंग रोड, भुसावळ येथे आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळेसाठी श्री. हितेंद्र नेमाडे सर (BFA – Painting), भुसावळ हे प्रशिक्षण देणार आहेत. या कार्यशाळेत इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी सहभागी होऊ शकणार असून, सहभागी विद्यार्थ्यांना भिजवलेले मातीचे गोळे अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे मोफत देण्यात येणार आहेत. मात्र, प्रत्येक कुटुंबासाठी एकच मातीचा गोळा देण्यात येणार असल्याने एका कुटुंबातून एका विद्यार्थ्याचेच नोंदणी करता येणार आहे. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक असून, पहिल्या १७५ विद्यार्थ्यांनाच संधी दिली जाणार आहे. १७५ नोंदणी पूर्ण झाल्यानंतर नोंदणी प्रक्रिया बंद करण्यात येईल. नोंदणी करताना सर्व माहिती इंग्रजीत भरण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. कार्यशाळेसाठी येताना विद्यार्थ्यांनी छोटा मग, पॅड किंवा पाटी, दोन खराब कापड, खराब पेन अथवा बारीक स्क्रू-ड्रायव्हर, दोन रद्दी पेपर व पिण्याच्या पाण्याची बाटली सोबत आणावी. इच्छुक विद्यार्थ्यांना गणपती तयार करण्यासाठी आवश्यक टूल बॉक्स सर्वोदय स्टेशनरी, जवाहर डेअरीजवळ, डेली बाजार, भुसावळ येथे उपलब्ध असल्याचेही आयोजकांनी सांगितले आहे. विद्यार्थ्यांनी घरून भरपेट जेवण करून यावे व सोबत थोडा नाश्ता आणावा. तसेच दिलेल्या वेळेच्या किमान १० मिनिटे आधी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा सुरुवातीपासून मार्गदर्शन करता येणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. या उपक्रमाचे प्रकल्प प्रमुख कुंदन वायकोळे, समन्वयक शिरीष कोल्हे, सहसमन्वयक विपिन वारके तसेच ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत सराफ हे कार्यरत आहेत. उपक्रम समितीमध्ये ज्ञानेश्वर घुले, योगेश इंगळे, प्रदीप सोनवणे, संजू भटकर, अमितकुमार पाटील, प्रसन्ना बोरोले, जीवन महाजन, शैलेंद्र महाजन, विक्रांत चौधरी, अमित चौधरी, समाधान जाधव, राजेंद्र जावळे, देव सरकटे, राजू वारके, हरीश भट, प्रा. श्याम दुसाने, तेजेंद्र महाजन, भूषण झोपे, उमेश फिरके, चंद्रकांत सूर्यवंशी, ललित महाजन, केतन महाजन, कपिल धांडे, राहुल भारंबे, प्रमोद पाटील, निवृत्ती पाटील, सचिन पाटील, जीवन सपकाळे, मंगेश भावे, किशोर नेहेते व दीपक नेहेते यांचा समावेश आहे. या पर्यावरणपूरक उपक्रमात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी आपला हातभार लावावा, असे आवाहन अंतर्नाद प्रतिष्ठान, भुसावळ यांच्यातर्फे करण्यात आले आहे. संपर्क कुंदन वायकोळे : ७५८८८१६९०५ शिरीष कोल्हे : ९०२१८२७५९० विपिन वारके : ९५२७२८७७८४ पत्रकार श्रीकांत सराफ : ९८८१४१८५८० संदीप वसंतराव पाटील : ७५८८००९४९२ / ९२०९२४८३९२ नोंदणी लिंक : व्हॉट्सअॅप ग्रुप :


