संत हराळे समाज बहु.संस्था नशिराबादच्या वतीने उद्योजकांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न:

 भुसावळ (प्रतिनिधी) - नशिराबाद येथील 
 महालक्ष्मी मंदिर सभागृहात  संत हराळे समाज बहुद्देशीय संस्थेची वार्षिक सर्व साधारण सभा रविवार दिनांक 16 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत घेण्यात आली.या  सभेत एकूण  सहा विषय सर्व सहमती ने  मंजूर करण्यात आले.
त्या नंतर माजी शिक्षण विस्तार अधिकारी 
"स्व. चंद्रकांत भारुळे साहेब अनाथ बालक दत्तक योजनेसाठी "दोन पात्र विद्यार्थी १)पुर्वी पाटील
२)भावेश पोतदार
यांना शालेय गणवेश; दप्तर;रजिस्टर;नोट बुक; टिफीन बाॅक्स;वाटर बोटल ;कंपासपेटी शैक्षणिक साहित्य  इ शैक्षणिक साहित्य,. रजनी सुरवाडे;वैशाली तायडे;इंद्रायणी भारुळे;अशोक सुरवाडे व वैशाली भारुळे यांच्या शुभ हस्ते दिली गेली.
 चर्मकार समाजातील  30 उद्योजकांचा सन्मान सोहळा...
अॅड. राजेश वाडेकर यांच्या अध्यक्षते खाली  30 समाज उद्योजकांना शाल,श्रीफळ,प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह,पुष्प गुच्छ देऊन यथोचित सन्मान मान्यवरांनी केला.
या प्रसंगी काही उद्योजक रोहिदास कळसकर (आई कलेक्शन चे संचालक); कल्पेश वाडेकर (हेक्झानेट प्रा.लि  पुणे चे संचालक ),मनिषा डोळे(मधुसूदन मेडीको संचालक);दिपाली सुरवाडे(देनाली फुड्स संचालक )या सरकार्थींनी आपले मनोगत व्यक्त करून संस्थेच्या कार्याचा गौरव केला.
तसेच इंद्रायणी भारुळे यांनी या उपक्रमाचे  उत्तम सोहळा असे कौतुक करून अनाथ बालक यांना दत्तक घेऊन त्यांना शैक्षणिक साहित्य व गणवेश दिला जाईल असे सांगितले.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा शेठ ला.ना. सा.विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री. संजय वानखेडे सर यांनी अतिशय प्रेरणादायी कार्यक्रम असल्याचे सांगून  सुशिक्षित तरुणांनी  नोकरीसाठी  इतरांच्या मागे न फिरता नोकरी देणारी भावी पिढी घडावी .असे आपले विचार मांडून संस्थेस 1111/- सामाजिक देणगी तर डॉ.श्री.युवराज सुरवाडे यांनी संस्थेस 5001/- ची सामाजिक देणगी दिली.कार्यक्रमाचे अध्यक्ष 
ॲड.श्री.राजेश वाडेकर यांनी संस्थेच्या समाजपयोगी उपक्रमांचे कौतुक करून संचालक मंडळाचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले. या प्रसंगी श्री.
प्रेमराज काकडे यांची संचालक पदी निवड करण्यात आली.
या  सामाजिक उपक्रमाचे सुत्रसंचालन व आभार  प्रदर्शन सेवानिवृत्त शिक्षक तथा संस्थेचे सचिव श्री. लिलाधर जी.भारुळे यांनी केले.हा सामाजिक उपक्रम
यशस्वी करण्यासाठी  संस्थेचे अध्यक्ष श्री.ज्ञानदेव भारुळे; श्री.गोपाळ भारुळे,श्री.प्रेमराज काकडे,मयूर भारुळे  तसेच सर्व संचालक मंडळ यांनी सहकार्य केले
या वेळेस बहुसंख्य समाज बंधू व भगिनी  उपस्थित होते.स्नेहभोजनाने या  उपक्रमाची सांगता करण्यात आली.