मध्य रेल्वे नागपूर आणि मडगांव दरम्यान विशेष गाड्या चालवणार ;

मध्य रेल्वे द्वारे येणाऱ्या गणेशोत्सवाच्या काळात भाविकांच्या सोयीसाठी नागपूर आणि मडगांव दरम्यान गणपती विशेष गाड्या चालवणार आहे. गणपती विशेष गाड्यांचा तपशील:

गाडी क्रमांक 01139 विशेष गाडी दिनांक १९.०८.२०२६ ते २३.०९.२०२६ पर्यंत दर बुधवार रोजी नागपूर येथून २३.४५ वाजता सुटेल आणि मडगांव येथे शुक्रवार रोजी ०५.३० वाजता पोहोचेल. (६ सेवा)
गाडी क्रमांक 01140 विशेष गाडी दिनांक १८.०८.२०२६ ते २२.०९.२०२६ पर्यंत दर मंगळवार रोजी मडगांव येथून १९.०० वाजता सुटेल आणि नागपूर येथे बुधवार रोजी २१.२५ वाजता पोहोचेल. (६ सेवा)

थांबे -: वर्धा, पुलगांव, धामणगांव, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि आणि करमळी.

गाडीची संरचना: ३ वातानुकूलित तृतीय, ८ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन.

तिकीट आरक्षणासाठी प्रवासी 'रेलवन' ॲप देखील डाउनलोड करू शकतात.
या विशेष गाड्यांच्या थांब्यांवरील तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा एनटीइएस ॲप डाउनलोड करा.