भुसावळ (प्रतिनिधी)- भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सामाजिक सेवा क्षेत्रात सक्रिय असलेल्या गरीब नवाज रिलीफ फाउंडेशन (GNRF), दावते इस्लामी इंडिया यांच्या वतीने भुसावळ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सुन्नी जामा मस्जिदजवळ, जाममोहल्ला 15 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुन्नी जामा मस्जिदजवळ, जाममोहल्ला, भुसावळ येथे होणार आहे. GNRFच्या वतीने नागरिकांना रक्तदानासारख्या पवित्र आणि सामाजिक कार्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध करून देण्यासाठी रक्तदान हे महत्त्वपूर्ण योगदान ठरू शकते. आयोजकांनी पात्र व निरोगी नागरिकांनी शिबिरात उपस्थित राहून रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. शिबिरासंदर्भात अधिक माहिती व नोंदणीसाठी 91561 11786 आणि 70205 83371 या क्रमांकांवर संपर्क साधावा. असेही आयोजक GNRF – गरीब नवाज रिलीफ फाउंडेशन, दावते इस्लामी इंडिया यांनी कळविले आहे


