पुणे (सुश्रुत जळूकर ) - नळस्टॉपकडून खिलारे पथावरून काळभैरव मंदिर चौकातून नळ स्टॉप, डेक्कनकडे जाणाऱ्या रस्त्यावर दिवसातील २० तास दुचाकींसह मोठ्या वाहनांची वर्दळ असते. सकाळी नऊनंतर दुपारी दोनपर्यंत; तसेच संध्याकाळी ५.३० नंतर रात्री उशिरापर्यंत नोकरदारांच्या वाहनांच्या रांगा लागतात. येथील सिग्नलची वेळ केवळ काही सेकंद आहे. त्यामुळे वाहने सिग्नल पार करून पुढे जाईपर्यंत पुन्हा सिग्नल लाल होतो. यामुळे वाहनचालकांची पुढे जाण्यासाठी स्पर्धाच लागते. या सिग्नलची वेळ वाढवावी.


