भुसावळ (प्रतिनिधी) - वरणगाव शहरासह ग्रामीण परिसरात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, शेतात असलेले रोहित्र वारंवार जळणे नादुरुस्त होणे तसेच कमी दाबाने वीजपुरवठा आणि बेकायदेशीर घरात बसविण्यात येत असलेले स्मार्ट मीटर अशा विविध समस्यांबाबत त्रस्त झालेले नागरिक यांच्या समस्यावर उपाय योजना ताबडतोब करण्यात याव्यात यासाठी जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या नेतृत्वाखाली उद्या मंगळवार ३० जुन रोजी सकाळी ११ वाजता शिवसेनेतर्फे वीज वितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढून आंदोलन करण्यात येणार आ मंगळवारी सकाळी १० वाजता शिवसेना संपर्क कार्यालय बस स्टँड येथून वीज वितरण कार्यालय येथे शिवसेनेतर्फे लोकशाही पद्धतीने मोर्चा काढून आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी वीज वितरण विभागाचे संबंधित ग्रामीण आणि शहरी अभियंता, कर्मचारी यांची उपस्थिती अनिवार्य आहे. उद्या मंगळवार रोजी होणाऱ्या या आंदोलनात ग्रामीण भागातील आणि वरणगाव शहरातील शेतकरी, नागरिक, शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी पदाधिकारी शिवसैनिक यांनी मोठ्या संख्येने बस स्टँड जवळील शिवसेना संपर्क कार्यालय येथे सकाळी १० वाजता हजर राहावे, असे आवाहन जिल्हाप्रमुख समाधान महाजन, विधानसभा प्रमुख संतोष माळी, शहरप्रमुख दुर्गेश बेदरकर, महिला तालुकाप्रमुख रेखा देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.



