भुसावळ (प्रतिनिधी)- भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वररत्न’ संगीत स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भुसावळ येथील प्रभाकर हॉलमध्ये रविवारी सायंकाळी आयोजित कार्यक्रमात संगीतप्रेमींनी मोठी उपस्थिती दर्शवित सभागृह स्वरमय केले. कार्यक्रमाची सुरुवात अश्विनी भंगाळे यांच्या सुमधुर गणेशस्तवनाने झाली. स्पर्धकांनी सादर केलेल्या दर्जेदार गायनामुळे संपूर्ण कार्यक्रम रंगतदार झाला. या स्पर्धेत ६५ स्पर्धकांनी भाग घेतला होता त्यातील २५ ते ३० स्पर्धकांचे आँडीशन द्वारे निवड करून त्यातून विजेते निवडण्यात आले. विशेष म्हणजे भुसावळ जळगाव, सावदा, फैजपूर कळमोदा, उल्हासनगर, ठाणे, अमरावती, नाशिक, व इतरही विविध गावांहुन उत्साही गायक हजर होते. या स्पर्धेतील सोलो गायन स्पर्धेत उल्हासनगरच्या देवश्री राजेश भंगाळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. कळमोदा येथील चेतन मयूर जावळे यांनी द्वितीय, तर वरणगावच्या मानस गोपाळ पाटील यांनी तृतीय क्रमांक मिळविला. विजेत्यांना अनुक्रमे ₹५००१, ₹३००१ व ₹२००१ रोख रक्कम, शिल्ड व प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात आले. युगल गीत स्पर्धेत उल्हासनगरचे राजेश भालचंद्र भंगाळे व देवश्री राजेश भंगाळे या जोडीने प्रथम क्रमांक मिळविला. ऐश्वर्या योगेश पाटील व योगेश प्रशांत राणे यांनी द्वितीय, तर चेतन ढाके व वर्षा पाटील यांनी तृतीय क्रमांक पटकावला. या विजेत्या जोड्यांनाही रोख ५००१, ₹३००१ व ₹२००१ रोख रक्कम,पारितोषिक, शिल्ड व प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण जळगावचे एन. ओ. चौधरी, भुसावळच्या चैताली पाचपांडे आणि फैजपूरचे शिवम चौधरी यांनी केले. त्यांच्या अचूक व पारदर्शक परीक्षक कार्याचे उपस्थितांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतिशय खुमासदार शैलीत वर्षा लोखंडे व सुभाषचंद्र भंगाळे यांनी केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. उल्हास पाटील, कुटुंबनायक ललितदादा पाटील तसेच भुसावळ विभाग प्रमुख सुहास चौधरी उपस्थित होते. विजेत्यांना डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. उल्हास पाटील म्हणाले की, “संगीत ही केवळ कला नसून मनःशांतीचा आणि तणावमुक्त जीवनाचा प्रभावी मार्ग आहे. अशा स्पर्धांमधून समाजातील सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळते आणि नवोदित कलाकारांना प्रेरणा मिळते.” कार्यक्रमाला डॉ. विकास कोळंबे, डॉ. वर्षा कोळंबे, प्रमोद धनगर, गोविंदा ढाके, निळू भारंबे, सुधीर पाटील, प्रभा पाटील, जगदीश फिरके, दिनेश पाटील, अरविंद झोपे, मनोज जावळे, जेष्ठ नागरिक संघाचे महादेव हरीमकर यांच्यासह अनेक मान्यवर व रसिक उपस्थित होते. पंचायत चे संचालक आरती चौधरी, हरीष फालक, परिक्षित ब-हाटे, शरद फेगडे, किरण चौधरी, मंगला पाटील, संजय पाटील, अजय पाटील, अनिल वारके, धनंजय पाटील हजर होते कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात आले. ३५० ते ४०० रसिकांची उपस्थिती कार्यक्रमाला लाभली होती.



