भुसावळात वीर योद्धा महाराणा प्रतापसिंह जयंती उत्साहात साजरी : राजस्थानी समाजाचा हिरीरीरे पुढाकार

भुसावळ (प्रतिनिधी ) : वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांची जयंती भुसावळ शहरात मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली. यानिमित्त शहरातून भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

या शोभायात्रेत युवक, महिला व बालकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या नागरिकांमुळे शोभायात्रेला विशेष आकर्षण प्राप्त झाले. ढोल-ताशांचा गजर, आकर्षक देखावे आणि महाराणा प्रताप यांच्या जयघोषांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले होते.

यावेळी समाजातील मान्यवरांनी महाराणा प्रताप यांच्या शौर्य, पराक्रम, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यांच्या आदर्शांवर चालत समाजहित आणि राष्ट्रसेवेचे कार्य करण्याचा संदेशही उपस्थितांना देण्यात आला.

महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून संपूर्ण वातावरण देशभक्ती आणि अभिमानाने भारावून गेले होते.
राजस्थानी समाजातर्फही जयंती साजरी --

भुसावळ:मेवाडचे राजे,वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांची जयंती भुसावळ येथे राजस्थानी समाजातर्फे उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. राजस्थानी विप्र संघटनेचे अध्यक्ष विनोद शर्मा यांनी प्रतिमेचे पूजन करून महाराणा प्रताप यांच्या शौर्याला आणि स्मृतीस विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी जे.बी. कोटेचा यांनी महाराणा प्रताप सिंह यांच्या जीवन प्रवासावर आणि त्यांच्या अद्भूत पराक्रमावर आपले मनोगत व्यक्त केले. 
    महाराणा प्रताप यांचे राष्ट्रप्रेम आणि संघर्ष आजही सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.या कार्यक्रमाला राजस्थानी समाजातील मान्यवर तसेच विनोद शर्मा,जे बी कोटेचा,चंद्रसिंग चौधरी,सत्यनारायण शर्मा,जयंतीलाल सुराणा,गौतम चोरडिया,विनोद मेहेता,कांतीलाल चोरडिया,विशाल चोरडिया,विजय चोरडिया,अतुल ताथेड,कैलास डीडवाणी,रामवल्लभ झवर,जितेंद्रसिंग चौधरी,सुनील ठाकूर,विनोद राठोड यांच्यासह अनेक समाज बांधवांची उपस्थिती होती.
सपूर्ण परिसरात यानिमित्ताने उत्साहाचे वातावरण होते.