चोपडा (प्रतिनिधी) : लग्नाचे आश्वासन देऊन एका 24 वर्षीय तरुणीशी वारंवार शारीरिक संबंध ठेवत अखेर लग्नास नकार दिल्याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि संशयित सईद सय्यद असद (वय 26, रा. चोपडा) हे एकाच परिसरात वास्तव्यास असल्याने त्यांच्यात परिचय होता. गेल्या आठ वर्षांपासून दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याचे समोर आले आहे. फिर्यादीनुसार, संशयिताने लग्नाचे आमिष दाखवत वेळोवेळी तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. दरम्यान, 1 जून रोजी दोघांचे लग्न होणार असल्याचे ठरले होते. मात्र समाजाच्या बैठकीत संशयिताने लग्नास नकार देत तिची फसवणूक केल्याचा आरोप तरुणीने केला आहे. या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 69, 352, 351(2) आणि 318(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी करीत असून पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.


