सामाजिक,धार्मिक शोषणाविरुद्धचा क्रांतिकारक लढा महात्मा फुले यांनी लढला – प्रा. डॉ.प्रल्हाद लुलेकर

जळगाव :-  महात्मा जोतिराव फुले समजून घेतांना शूद्र,अतिशूद्र आणि स्त्रिया यांचं जगणं समजून घेणं आवश्यक आहे त्याशिवाय महात्मा फुले समजणार नाहीत,सामाजिक ,धार्मिक शोषणाविरुद्धची क्रांती महात्मा फुले यांनी केली,फुले आंबेडकरांची चळवळ माणसाला आत्मभान आणणारी चळवळ आहे असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.प्रल्हाद लूलेकर यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती तर्फे  महात्मा फुले द्वी जन्मशताब्दी निमित्त आयोजित कार्यक्रमात '  महात्मा फुले यांच्या विचारांची प्रासंगिकता '  विषयावर बोलताना व्यक्त केले.अध्यक्षस्थानी डॉ.अब्दुल करीम सालार होते.
      अभियंता भवन , जळगाव येथे दिनांक १४ जून रोजी आयोजित या कार्यक्रमात डॉ.लूलेकर पुढे म्हणाले,जोतिराव फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी समाज बदल घडवून आणतांना प्रत्येक वेळी एक संस्था उभारली आणि ह्या संस्था जनतेला, समाजाला खुल्या करून दिल्यात महात्मा फुले यांनी शिक्षण बंदी, रोटी बंदी,बेटी बंदीची साखळी तोडली आणि सर्वार्थाने भारतीय समाजव्यवस्थेला  समानतेची दिशा दिली .
    विचारमंचावर  समितीचे अध्यक्ष मुकूंद सपकाळे , साहित्यिक जयसिंग वाघ, कवी डॉ. मिलिंद बागुल संविधान प्रचारक प्रा.अशोक पवार उपस्थित होते प्रास्ताविक उपप्राचार्य  प्रा.डॉ.सत्यजित साळवे , भूमिका विषद मुकुंद सपकाळे,सूत्र संचालन बापूराव पानपाटील,आभार प्रा.  प्रीतीलाल पवार यांनी मानले कार्यक्रमास प्रा.प्रकाश कांबळे, वाल्मीक जाधव,दिलीप सपकाळे,दिलीप शिरतुरे,संध्या तायडे,कमल धिवरे,तुळशीराम सोनवणे,महेंद्र केदार, अशोक बिऱ्हाडे,अजय बिऱ्हाडे,हेमंत बिऱ्हाडे, आर. टी.सोनवणे, सुनिल सोनवणे,संतोष कचरे,अमोल कोल्हे,अनिल सुरडकर,सोमा भालेराव, भैय्यासाहेब देवरे, व अन्य मान्यवर उपस्थित होते. प्रा. डी. एस.पाटील,  प्रा. संजय पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
फोटो ओळ...
महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करतांना डॉ. प्रल्हाद लुलेकर सोबत प्रा. डॉ. सत्यजित साळवे , जयसिंग वाघ , डॉ. करीम सालार  , बापू पानपाटील ,  मुकुंद सपकाळे , डॉ. मिलिंद बागुल , प्रा. प्रितलाल पवार , प्रा. अशोक पवार .