रिवा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – रिवा विशेष गाडीचे नियमित सेवेत रूपांतर

भुसावळ (प्रतिनिधी) – रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि रिवा दरम्यान धावणाऱ्या विशेष गाड्या नियमित केल्या आहेत. या गाड्या आता नवीन क्रमांकांसह नियमित गाड्या म्हणून चालवल्या जातील, ज्यामुळे प्रवाशांची सोय वाढेल आणि कामकाज अधिक सुव्यवस्थित होईल. सध्या कार्यरत असलेल्या गाडी क्रमांक 02187/02188 रिवा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – रिवा साप्ताहिक विशेष गाड्यांचे खालीलप्रमाणे नियमित सेवांमध्ये रूपांतर केले जाईल:

  • गाडी क्रमांक 20153 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – रिवा साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस (दिनांक २४.४.२०२६ पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून)
  • गाडी क्रमांक 20154 रिवा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस (दिनांक २३.४.२०२६ पासून रिवा येथून)

नियमित सेवा सुरू झाल्यामुळे विशेष गाड्या बंद:

  • गाडी क्रमांक 02188 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – रिवा विशेष गाडी दिनांक २४.०४.२०२६ पासून बंद करण्यात येईल.
  • गाडी क्रमांक 02187 रिवा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष गाडी दिनांक २३.०४.२०२६ पासून बंद करण्यात येईल.

रेल्वे सेवांचा तपशील:
गाडी क्रमांक 20153 ही २४.०४.२०२६ पासून दर शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १३:३० वाजता सुटेल आणि रिवा येथे दुसऱ्या दिवशी ०९:४५ वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक 20154 ही २३.०३.२०२६ पासून दर गुरुवारी रिवा येथून १५:५० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १२:२० वाजता पोहोचेल.

थांबे: दादर, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, हरदा, इटारसी, पिपरिया, गाडरवारा, नरसिंहपूर, जबलपूर, कटनी, मैहर आणि सतना,

संरचना: १ प्रथम वातानुकूलित श्रेणी, १ वातानुकूलित २, ४ वातानुकूलित ३, १२ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ सामान आणि गार्ड ब्रेक व्हॅन.

या गाड्यांच्या सविस्तर वेळा आणि थांब्यांसाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.

प्रवासी तिकीट बुकिंगसाठी RailOne ॲप देखील डाउनलोड करू शकतात.

प्रवाशांनी कृपया गाडी क्रमांकातील बदलाची नोंद घ्यावी.