भुसावळ (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेला ४६ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भुसावळ शहर उत्तर मंडळाच्या वतीने सोमवार, दि. ६ एप्रिल रोजी स्थापना दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

शहरातील महाराणा प्रताप चौक येथे आयोजित कार्यक्रमात केंद्र व राज्यातील भाजपा सरकारने राबविलेल्या विविध कल्याणकारी योजना व विकासकामांची आकर्षक प्रदर्शनी मांडण्यात आली होती. कार्यक्रमाची सुरुवात पंडित दीनदयाल उपाध्याय, श्यामाप्रसाद मुखर्जी व भारत माता यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
या प्रसंगी राज्य परिषद सदस्य प्रमोद भाऊ सावकारे, मंडळ अध्यक्ष संदीप सुरवाडे तसेच भाजपा गटनेते युवराज लोणारी यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “आजचा स्थापना दिवस हा पक्षाच्या वाढीसाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या, अनेक अडचणींचा सामना करत संघर्षातून पक्ष उभा करणाऱ्या निष्ठावान जुन्या कार्यकर्त्यांना समर्पित आहे.”
कार्यकर्त्यांनी परिसरात पेढे वाटप करून आनंद साजरा केला. “भारतीय जनता पार्टीचा विजय असो” व “भारत माता की जय” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
कार्यक्रमास जिल्हा सरचिटणीस परीक्षित बऱ्हाटे, जिल्हा उपाध्यक्ष खुशाल जोशी, जिल्हा चिटणीस प्रवीण इखणकर, माजी प्रदेश सचिव अजय भोळे, नगरसेवक किरण कोलते यांच्यासह पुरुषोत्तम नारखेडे, बोधराज चौधरी, प्रमोद नेमाडे, सतीश सपकाळे, राजेंद्र नाटकर, सुजित भोळे, चंद्रशेखर इंगळे, निळकंठ भारंबे,शहर सरचिटणीस पवन बुंदेले, सागर चौधरी, जयंत माहुरकर, डॉ. प्रसाद बोंडे, किरण पाटील, कैलास शेलोडे, नारायण रणधीर, राहुल तायडे, ललित मराठे, अल्बर्ट तायडे, रामशंकर दुबे,रवींद्र ढगे, प्रा धीरज पाटील,शंकर शेळके, युवा मोर्चा अध्यक्ष संकल्प वाणी, नगरसेविका शोभा इंगळे, ज्येष्ठ कार्यकर्त्या अलका शेळके, शैलेजा पाटील, माधुरी चौधरी, सागर साळी, गोकुळ बाविस्कर, चेतन जैन, ऋषभ राजपूत, प्रा.विलास अवचार, प्रमोद पाटील, निलेश पाटील, चेतन बोरोले, संतोष ठोकळ, भावेश चौधरी, जितेंद्र वाघमारे, हर्षल जोशी, प्रथमेश रणधीर, गणेश जाधव, रहमान शेख आदींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


