मुंबई, – भुसावळ येथील आर्या बहुउद्देशीय सेवा फाउंडेशन अध्यक्षा डॉ. सौ. वंदना उमेद्र वाघचौरे, यांना दि. 25 व 26 मार्च 2026 रोजी मुंबई येथे महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत आयोजित “राष्ट्रपिता महात्मा गांधी राष्ट्रस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे उत्साहपूर्ण वातावरणात हा सोहळा पार पडला.

या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून रामदास आठवले (माजी राज्यमंत्री, सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार), राहुल नार्वेकर (अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा), संजय शिरसाट (मंत्री, सामाजिक न्याय व पालकमंत्री, संभाजीनगर), माधुरी मिसाळ (राज्यमंत्री, सामाजिक न्याय, नगर विकास, परिवहन, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्यांक विकास), अरविंद सावंत (लोकसभा सदस्य), रितू तावडे (महापौर, मुंबई), डॉ. हर्षदीप कांबळे (प्रधान सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग) तसेच दीपा मुधोळ मुंडे (आयुक्त, समाज कल्याण, पुणे) यांची उपस्थिती लाभली.या सोहळ्यात सन 2020-21, 2021-22, 2022-23, 2023-24 आणि 2024-25 या सलग वर्षांतील उल्लेखनीय कार्यासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची प्रतिमा असलेली शिल्ड, प्रमाणपत्र, सन्मानाची साडी आणि धनादेश असे होते
.जळगाव जिल्ह्यातील मानकरी म्हणून आर्या बहुउद्देशीय सेवा फाउंडेशनच्या डॉ. सौ. वंदनाताई उमेद्र वाघचौरे, यांना व्यसनमुक्ती क्षेत्रातील उल्लेखनीय व निःस्वार्थ कार्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते “राष्ट्रपिता महात्मा गांधी राष्ट्रस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार” प्रदान करण्यात आला. आर्या बहुउद्देशीय सेवा फाउंडेशन गेली 17 वर्षे व्यसनमुक्ती, जनजागृती आणि पुनर्वसन क्षेत्रात सातत्याने कार्यरत असून “नवजीवन व्यसनमुक्ती केंद्र व हॉस्पिटल”च्या माध्यमातून अनेक व्यसनाधीन व्यक्तींना नवजीवन देण्याचे कार्य करत आहे डॉ.
डॉ वंदनाताई वाघचौरे या व्यवसायाने डॉक्टर असल्या तरी समाजसेवेची तळमळ जपत त्यांनी व्यनमुक्त समाज घडवण्याचा ध्यास घेतला आहे. त्यांच्या अथक परिश्रमामुळे अनेक कुटुंबे पुन्हा एकत्र आली असून समाजात सकारात्मक परिवर्तन घडत आहे.या सन्मानामुळे जळगाव जिल्ह्याचा गौरव वाढला आहे समाजातील सर्व स्तरांतून त्यांचेवर शुभेच्छांचा वर्षाव होत असून अभिनंदन होत आहे. “व्यसनमुक्त महाराष्ट्र” घडवण्याच्या दिशेने हे एक प्रेरणादायी पाऊल असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.



