मुंबई –
५५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आणि आजारांचा सामना करत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना कामावर न बोलवण्याच्या सूचना आयुक्तांकडून पोलिस ठाण्यांना आणि वाहतूक पोलिस विभागांना देण्यात आल्याने कर्मचार्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत तीन पोलिस कर्मचार्यांचा मृत्यू झाल्यानंतर पोलिस आयुक्तांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
गंभीर आजार असलेल्यांना घरीच राहण्याचे आदेश
५५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आणि आजार असलेल्या पोलीस कर्मचार्यांना सुट्टी देण्याचा निर्णय आयुक्तांकडून घेण्यात आला आहे. यामुळे असे कर्मचारी सोमवार २८ एप्रिल पासून ते लॉकडाऊन संपेपर्यंत भरपगारी रजा घेऊ शकणार आहेत तर ज्या हवालदारांना स्वत:हून कामावर यायची इच्छा असल्यास त्यांना येऊ द्यावं, असंदेखील आयुक्तांनी म्हटलं आहे. ४८ तासांमध्ये कोरोनामुळे मुंबई पोलिस दलातील तीन कर्मचार्यांचा मृत्यू झाल्यानंतर आयुक्तांनी पोलिस ठाण्यांना आदेश दिले आहेत.



