यावल (प्रतिनिधी ) -यावल तालुक्यातील एका शिक्षिकेने BLO बाबत देऊ केलेला लेखी अर्ज माननीय तहसीलदार मॅडम यांनी उद्दामपणे स्वतः तर स्वीकारला नाहीच पण टपाल घेणाऱ्या क्लार्कला ही स्वीकारू नको असे सांगून मग्रूर वृत्तीचे दर्शन घडविले त्यांच्या ह्या बेजबाबदारवृत्ती मुळे संबंधित शिक्षिकेला प्रचंड मानसिक त्रास झाला. मा.तहसीलदार मॅडमच्या अशा वागणुकीबाबत नाशिक विभाग आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार करीत असल्याचे शिक्षकांचे जेष्ठ नेते, व भाजपा शिक्षक आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्र. ह.दलाल यांनी एक प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की,सर्वोच्च न्यायालयासह उत्तर प्रदेश,मुंबई उच्च न्यायालयांनी शाळा व अध्यापनाचे काम सुरू असताना शिक्षकांना BLO ची काम देऊ नये असे म्हटले आहे सर्वातमहत्वाचे म्हणजे राज्याच्या उपसचिवानी दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी एका आदेशान्वये राज्यातील सर्व विभाग अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेशित केले आहे की ,प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळचे सोडून निवडणुकीबाबत इतरवेळी चालणारे काम हे अ शैक्षणिक काम असल्याने त्याबाबत शिक्षकांना शक्ती करू नये ,बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क,अधिनियम 2009 कलम 27 मध्येही शाळा सुरू असताना शिक्षकांना अ शैक्षणिक काम देण्यास मनाई करण्यात आली आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे विनंती अर्ज देणाऱ्या शिक्षिकेची शाळा ही फक्त दोन शिक्षिका शाळा असून शिक्षक दोन त्यातील एक मुख्याध्यापक म्हणजे शाळेत फक्त एकच शिक्षिका व वर्ग चार(१ ते ४) अशा स्थितीत त्या शिक्षिकेला blo चे काम दिले तर संपूर्ण शाळाच बंद पडेल तशात हा परीक्षांचा हंगाम विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून ,परीक्षाही घेता येणार कशा? ही वस्तुस्थिती त्या शिक्षिका तहसीलदार मॅडमला सांगण्यासाठी दोन दिवसांपासून फेऱ्या मारत आहेत पण मग्रूर तहसीलदार मॅडम त्यांचे ऐकून घेतले नाही आणि त्यांचा अर्जही फेटाळून उद्दामपणे स्वीकारणेस नकार दिला एवढेच नव्हे तर संबंधित क्लार्कलाही स्वीकारू दिला नाही ह्या तहसीलदार मॅडमच्या ह्या बेजबाबदार वृत्ती बद्दल त्याची तक्रार नाशिक विभाग आयुक्त व जिल्हाधिकारी यांचे कडे संघटनेतर्फे करीत असून प्रसंगी शिक्षिकेला दिलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे झालेल्या मानसिक त्रासाबद्दल तहसीलदार मॅडम विरुद्ध न्यायालयातही दाद मागावी लागेल त्याशिवाय अशा उद्दाम,बेजबाबदार अधिकाऱ्यांना आपले कर्तव्य समजणार नाही असेही पत्रकात प्र. ह.दलाल यांनी म्हटले आहे.



