भुसावळ (प्रतिनिधी )-
सध्या महिन्यापासुन कोरोना व्हायरस इन्फेक्शनला रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉक डाउन सुरु आहे.त्यामुळे संपूर्ण भारतभर बऱ्याच नागरिकांना दोन वेळचा जेवण्याचा प्रश्न भेडसावत आहे. यासाठी केंद्र व राज्य सरकार आणि विविध सामाजिक संस्था पुढाकार घेत आहेत.आन्तरराष्ट्रीय कृष्णभवनामृत संघ(इस्कॉन)
या संस्थेतर्फे मुंबई,पुणे,नागपुर,अहमदाबाद , दिल्ली व इतर ठिकाणी दिवसाला जवळपास ३० ते ४० हजार लोकांना जेवण पुरवित आहेत. याच अनुशंघाने आज २६ एप्रिल अक्षयतृतीयाचे निमित्त साधुन इस्कॉन भुसावळ तर्फे फक्त मजूरीवर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीणाऱ्या भुसावळ शहराला लागून असलेल्या मिरगव्हाण व खेड़ी खुर्द येथील ५० -६० कुटुंबाना साखर,तेल व तुरडाळ चे इस्कॉन भुसावळचे व्यवस्थापक श्रीमान रासयात्रा प्रभूजी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.यावेळी पिंप्रीसेकम येथील ग्रामविकास अधिकारी संजय भारंबे, सावदा येथील परिरक्षण भूमापक प्रदीप माळी, इस्कॉन भुसावळ येथील मनोहर प्रभूजी व डॉ राजेन्द्र फिरके है उपस्थित होते. अक्षय तृतीयेच्या दिवशी मिळालेल्या मदतीमुळे ग्रामस्थानी समाधान व्यक्त केले.



