पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस व महात्मा गांधी जयंतीचे औचित्यसाधून महसूल विभाग राबविणार सेवा पंधरवाडा -प्रांताधिकारी जितेंद्र पाटील :

भुसावळ(, दिनांक 11 सप्टेंबर: प्रतिनिधी) – देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा १७ सप्टेंबर २०२५ रोजी वाढदिवस व २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती यांचे औचित्य साधून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर हा राज्यस्तरीय आरोग्य पंधरवाडा साजरा करण्याचे आयोजित केले आहे .
महसूल विभागाच्या वतीने आयोजित या राज्यस्तरीय सेवा पंधरवाडयात नागरिकांना ,गरजू व महिला तसेच विद्यार्थी , जेष्ठ नागरिक , शेतकरी आदींना विविध योजनासह आरोग्य सेवाचा लाभ मिळणार आहे . या पार्श्वभूमीवर भुसावळ , बोदवड , मुक्ताईनगर या तालुक्यामध्ये सदर पंधरवाडा भव्य स्वरूपात साजरा केला जाणार असल्या बाबत प्रांताधिकारी श्री जितेंद्र पाटील यांनी आज गुरुवार रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली.
यावेळी तहसीलदार नीता लबडे , बोदवड तहसीलदार व मुक्ताईनगर तहसीलदार उपस्थित होते .

; यावेळी प्रांताधिकारी श्री पाटील यांनी सांगितले की , दिनांक १७ पासून महसूल विभाग व इतर विभागाच्या समन्वय साधून वा पंधरवाड्यात सामान्य नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी आणि महसूल विभागाच्या कामकाजाची जनजागृती करण्यासाठी नागरिकांचा दृष्टिकोन सकारात्मक राहावा याकरिता विशेष शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.

यापंधरवाड्यात मुख्यतः थकबाकी वसुलीसंदर्भावर भर दिला जाणार आहे अवैध उत्खनन, अवैध गौण खनिज वाहतूक कारवाई जप्ती महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी तालुक्यातील अवैध उत्खनन करणाऱ्या घटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत अवैध उत्खननावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचेही प्रांताधिकारी श्री पाटील यांनी स्पष्ट केले तसेच जिवंत ७/१२ मोहीम राबविण्यात येणार आहे , ग्रामीण भागासह अन्य ठिकानावरील स्मशानभूमी दफनभूमी वरील अतिक्रमण बाबत , महापुरुषांच्या पुतळ्याची विटम्बना होऊ नये यासाठी १७ चा जी आर पालन करण्याच्या सूचना देणे , छत्रपती शिवाजी महाराज महासमाधान शिबीर योजना महाराष्ट्र्र प्राधिकरण योजनेअंतर्गत पात्र व गरजू विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलिअर , जातीचे दाखले व विविध शैक्षणिक दाखले याकरिता शिबीर घेणे जेणेकरून शिक्षणात अडथळा येणार नाही. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील व्यक्तींच्या भेटी घेऊन सांत्वन करून त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळतो की नाही हे बघणे त्यांना अर्थ साहाय्य योजनेचा लाभ मिळवून देऊन आर्थिक उभारी देण्याचा प्रयत्न करणे यामुळे शेतकऱ्यांच्या मानसिक व आर्थिक दु:खावर भरारी मिळविण्यासाठी पुढाकार घेतला जाणार आहे. , श्रावणबाळ , संजय गांधी इंदिरा गांधी योजना निराधार आर्थिक कमकुवत घटकयांना लाभ मिळवून देणे यात नवीन लाभार्थ्याची निवड करून लाभ देणार , तसेच ई शिधा पत्रिका वितरण आदी सेवा देण्यात येणार आहे .

या पंधरवाडयाचा भव्य उद्घाटन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वाढदिवसालादिनांक १७ सप्टेंबर रोजी केंद्रीय मंत्री रक्षा ताई खडसे , वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांचेसह लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे .

प्रशासनाच्या या कृतीमुळे नागरिकांना सोयीस्कर सेवा देण्यासोबतच सामाजिक न्याय व शाश्वत विकासाची जाणीव निर्माण होणार आहे.
कार्यक्रमात स्थानिक पत्रकार, नागरिक तसेच प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. समारोप २ ऑक्टोबर रोजी होणार असला तरीही नागरिकांच्या हितासाठी नाविन्यपूर्ण योजना पुढे देखील राबविण्यात येणार असल्याचेही यावेळी प्रांताधिकारी श्री पाटील यांनी सांगितले .