देवगिरी कल्याण आश्रमाच्या शिक्षाआयाम अंतर्गत साकेगाव तिघ्रे गावात बाल संस्कार केंद्र सुरू ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – देवगिरी कल्याण आश्रमाच्या शिक्षा आयाम चे अंतर्गत बाल संस्कार केंद्र तालुक्यातील साकेगाव नजिक तिघ्रे या गावी भिल्ल वस्तीत बुधवार दिनांक १०/९/२०२५ रोजी बालसंस्कार केंद्राचे उद्घाटन गडचिरोली येथील क्षेत्र महिला प्रमुख जास्वंदाताई यांच्या उपस्थितीत करण्यात आले . बालसंस्कार केंद्राचे नाव राणी दुर्गावती बाल संस्कार केद्र असे ठेवले प्रसंगी व्यासपीठावर प्रांत महिला प्रमुख चित्रा पुराणिक , जिल्हा महिला प्रमुख ऍड जास्वंदी भंडारी , तालुका प्रमुख उज्वला बागुल , तालुका सहप्रमुख अनिता ठाकरे , नगरीय जनसंपर्क निधी संकलन प्रमुख मुकुंद दादा प्रचंड उपस्थित होते . याप्रसंगी राणी दुर्गावती व कल्याण आश्रमाचे कार्य व शिक्षा आयामाचे महत्व आदींबाबत सविस्तर माहिती जिल्हा प्रमुख ॲड जास्वंदी भंडारी यांनी दिली, यावेळी उपस्थित मुलींनी गीते सादर केली तर मुलांनी उत्स्फूर्तपणे गीत सादर केले

जिल्हा महिला प्रमुख ऍड जास्वंदी भंडारी यांचे मार्गदर्शनाखाली सौ अनिता ठाकरे यांच्या विशेष प्रयत्नानी तिघ्रे गावात पहिल्यांदच हे बाल संस्कार केंद्र सुरू झाले आहे . दर रविवारी सकाळी 11 वाजता सौ गायत्री तायडे या बालसंस्कार वर्ग घेणार आहेत तरी प्रत्येक रविवारी मुलांनी बालसंस्कार केंद्रासाठी यावे असे आवाहन यावेळी करण्यात आले . कार्यक्रम यशस्वितेसाठी सौ अनिता ठाकरे , सौ गायत्री तायडे ,सौ जयश्री तायडे ,सौ निकिता तायडे व सौ मीराबाई तायडे यांचेसह महिलांनी परिश्रम घेतले . यावेळी बालसंस्कार केंद्रास फळा , खडू व स्तोत्र पुस्तके मुकुंद प्रचंड यांनी उपलब्ध करून दिले तसेच उपस्थित सर्व मुलांमुलींना व महिलांना खाऊ वाटप करण्यात आले .