यावल – यावल नगरपालिकेत शहरातील विस्तारित भागात असलेल्या कृष्ण तारा नगर, गट क्रमांक 756 या भागातील समस्या सोडविण्यासाठी येथील नागरिकांनी मागणी केली असून याबाबत १६ जुलै रोजी पालिकेला निवेदन दिले आहे .
निवेदनात नमूद आहे की , या भागात गटारी बनवलेल्या नाही. रस्त्याचे काम झालेले नाही. परिणामी सांडपाण्याचा निचरा होत नाही. या भागात कचरा उचलण्यासाठी वाहन येत नाही. या भागात स्वच्छता राबविण्यात यावी व गटारी आणि रस्त्याचे काम होत नाही , तसेच या भागात अद्याप पावतो विकासकामे झालेली नाही. नगरपालिकेचे सफाई कर्मचारी देखील या भागात येत नाही. या भागात गटारी बांधल्या गेल्या नसल्याने सांडपाण्याचा निचरा होत नाही. ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचलेले असतात. त्यातून डासांची उत्पत्ती होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी डेंगू आजारामुळे एकाचा या ठिकाणी मृत्यू झाला होता. तेव्हा सध्या पावसाळा सुरू असून या भागात पावसाचे पाणी रस्त्यावर येऊन चिखल होतो व शालेय विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी अडचणी निर्माण होतात.तरी संबंधितांनी . त्वरीत या गंभीर बाबींची दखल घेऊन या भागातील समस्या सोडवाव्यात अन्यथा 1 ऑगस्टपासून नगरपालिकेसमोर धरणे आंदोलन करू, असा तीव्र इशारा निवेदनातून देण्यात आला.

यावेळी कृष्ण तारा मधीलनागरिक बहुसंख्येने उपस्थित होते . दिलेल्या निवेदनावर अशपाक शाहसह पप्पू तडवी, इमरान खान, शेख मझहर, शेख मजीद, धीरज साळुंखे, अजय जोशी, नसीर खान, वामन तायडे सह अनेकांच्या स्वाक्षर्या आहेत.


