जनगणना होणार डिजिटल. सरकारच्या निर्णयाचे स्वागत -शिशिर जावळे. नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने स्वतःची माहिती अपलोड करता येणार

भुसावळ (प्रतिनिधी ) – लवकरच भारतात जनगणना करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे . यामध्ये आहे एआय तंत्रज्ञानाचा ऑनलाईन पद्धतीचा वापर सुद्धा इतिहासात प्रथमच वापर करण्यात येणार आहे. नागरिकांना आता घरी बसून जनगणनेची माहिती स्वतः भरता येणार आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की २०२७ मध्ये होणारी ही जनगणना प्रथमच ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. नागरिक स्वतःच जनगणनेतील माहिती भरू शकणार आहे
देशात दर दहा वर्षांनी जनगणना होते. २०२१ मध्ये कोरोनामुळे जनगणना होऊ शकली नाही. त्यामुळे आता २०२७ मध्ये जनगणना होणार आहे.
यावर्षीची जनगणना ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. नागरिकांना त्यांच्या घरी बसून जनगणनेतील माहिती ऑनलाइन पोर्टलवर भरावी लागणार आहे.
प्रथमच नागरिक स्वतःच त्यांची माहिती ऑनलाइन पद्धतीने भरू शकणार आहेत. त्यामुळे जनगणनेची प्रक्रिया जलद आणि सोपी होईल.लवकरच केंद्र सरकार एक अधिकृत जनगणना पोर्टल सुरू करणार आहे. या पोर्टलद्वारे नागरिक जनगणनेत पहिल्या जीपीएस टॅगिंग ,ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून, वेब सहभागी होऊ शकतील.२०२७ च्या जनगणनेसाठी संदर्भ तारीख १ मार्च २०२७ असेलया जनगणनेत जातनिहाय माहिती देखील घेतली जाणार आहे. ऑनलाइन पद्धतीने जनगणना झाल्यास, निकाल लवकर मिळतील. पूर्वी १८ महिने लागत होते, आता ९ महिन्यांत निकाल अपेक्षित आहेत. सरकारचा हा निर्णय ऐतिहासिक असून नागरिकांना त्यांची जात निहाय माहिती स्वतः भरण्यास मुभा मिळाल्यामुळे हे कार्य लवकर पूर्ण होऊन जातनिहाय गणना मुळे नागरिकांना येणाऱ्या कालखंडामध्ये त्यांचे हक्क व विविध शासकीय योजनांचा लाभ मिळणे अतिशय सुलभ होईल. त्यामुळे या ऐतिहासिक निर्णयाच स्वागत भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव शिशिर जावळे यांनी केलेले आहे.