भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरु असतांना काही नागरिक वारंवार उल्लंघन करत असल्यामुळे पोलिस प्रशासनाने नागरिकांवर धडक कारवाईची मोहीम सुरू ठेवली असून भुसावळ उपविभागात संचारबंदी दरम्यान कलम १८८ अन्वये ३०५ केसेस करून १५७ वाहने जप्त केली आहे यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनता बाहेर निघून नये म्हणुन पोलीस विभागातर्फे दिवसरात्र एक करुन बंदोबस्त,नाकेबंदी लावण्यात येत असुन पोलीस खडा पहारा देत आहे. शहरातील प्रमुख मार्गाने पथसंचलन काढून शक्तिप्रदर्शन करण्यात आले. बाजारपेठ पोलिस ठाण्यापासून पथसंचलन सुरु करुन शहरातील स्टेशन रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा,जाम मोहल्ला,रजा टॉवर, खडका रोड,शनि मंदीर वार्ड, बाजार परिसरासह शहरातील मुख्य मार्गावरुन काढण्यात आले होते.तरीही काही टार्गट चोरट्या मार्गांनी गाड्यांवर फिरत असल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांच्या नेतृवाखाली धडक मोहीम राबवून ३०५ वाहनांवर कलम १८८ नुसार कारवाई करुन १५७ वाहने जप्त करण्यात आली आहे. यात बाजारपेठचे पो.नि. दिलीप भागवत,शहरचे पो.नि.बाबासाहेब ठोंबे, तालुक्याचे पो.नि. रामकृष्ण कुंभार,नशिराबादचे सपोनी श्री.साळुंखे, वाहतुक शाखेचे पोउपनि के. टी. सुरळकर यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी सहभागी होत आहे .



