रावेर (प्रतिनिधी) : रावेर तालुका बौद्ध समाजाने रावेर पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांच्या तात्काळ निलंबनाची मागणी केली आहे. शांतता समितीच्या बैठकीत त्यांनी बौद्ध समाजाच्या भावना दुखावतील असे वक्तव्य केल्याचा आरोप Urdu.

आज सकाळी ११ वाजता रावेर पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत तहसीलदार बंडू कापसे, नगरपरिषद मुख्याधिकारी तसेच विविध समाजांचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान, विशाल जयस्वाल यांनी “डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत सहभागी होणारे लेझीम पथक दारू पिऊन येतात” असे वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आह
बौद्ध समाजाचा तीव्र विरोध, निलंबनाची मागणी या वक्तव्यामुळे बौद्ध समाजाच्या भावना दुखावल्या असून, समाजाने या प्रकरणी तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात जयस्वाल यांचे तात्काळ निलंबन करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
मुख्य मागण्या : विशाल जयस्वाल यांना तात्काळ निलंबित करावे. बौद्ध समाजाची जाहीर माफी मागावी. भविष्यात अशा वक्तव्यांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी कडक उपाययोजना कराव्यात.ही तक्रार तहसीलदारांसह मुख्यमंत्री, राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोग, जिल्हाधिकारी व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आली आहे. या प्रकरणी प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
निवेदनावर समाजाच्या प्रमुख व्यक्तींच्या स्वाक्षऱ्या बौद्ध समाजाच्या अनेक सदस्यांनी या निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या असून, त्यात डॉ. बाबा साहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष, संघरक्षक तायडे, उपाध्यक्ष अक्षय मासाने, सचिव अमोल तायडे, कोषाध्यक्ष गोपाल तायडे यांचा समावेश आहे. याशिवाय, महेंद्र गजरे, सुधीर सैंगभिरे, बाबुराव राजाराम शिरतुरे, अजय विजय मेढे, आकाश तायडे, आनंद शिंदे, प्रकाश बाबू अडकमोल, पंकज विजय डोळे, अभिनव राजेंद्र इंगळे, पंकज वसंत वाघ, प्रमोद मधुकर मेढे, नवीन तायडे आदींनीही आपल्या सह्या देऊन पाठिंबा दर्शवला आहे.
प्रशासनाची भूमिका महत्त्वाची बौद्ध समाजाने दिलेल्या या निवेदनामुळे स्थानिक पोलीस प्रशासन आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. आता प्रशासन या मागणीवर काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.


