जळगाव जिल्ह्यात बोगस शिक्षकांवर कारवाई, ५१ बोगस शिक्षकांचं वेतन बंद, शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ ;

जळगाव – जळगाव जिल्ह्यात बोगस शिक्षकांची भरती केली असून आता पर्यंत घेतलेला पगारही शासन बोगस शिक्षकांकडून वसूल करणार आहे. अशा ७९ बोगस शिक्षकांवर कारवाई केली असल्याच समोर आलं असून त्या पैकी ५१ शिक्षकांवर कारवाई करून त्याचे वेतन बंद करण्यात आले असून २८ शिक्षक न्यायालयात गेल्याने त्यांचे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. असे तीन हजाराहून अधिक शिक्षक बोगस असल्याची माहिती मिळत आहे.

शाळांची चौकशी करण्याची मागणी केली जात असून जळगाव जिल्ह्यात ५१ बोगस शिक्षकांचं वेतन बंद करण्यात आले आहे. मात्र इतर २८ शिक्षक न्यायालयात गेल्याने यांचे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. इतकाच नाही तर त्या बोगस शिक्षकांनी आतापर्यंत घेतलेलं वेतनही त्यांच्या कडून वसूल करण्यात येणार आहे. या सर्व शाळांच्या चौकशीची शिक्षण तज्ञांकडून मागणी केली जात आहे .

जळगाव जिल्ह्यातील १० शिक्षण संस्थांमध्ये शिक्षकांची बोगस भरती करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहे. या घोटाळ्याचा पर्दाफाश झाल्यानंतर याप्रकरणी दीड लाख रुपये वेतन असलेल्या नाशिक शिक्षण उपसंचालक कार्यालयातील लेखाधिकारी उदय पंचभाई व जळगाव माध्यमिक वेतन पथकाचा अधीक्षक राजमोहन शर्मा यांच्यावर गुरुवारी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या दोघांनी जळगाव जिल्ह्यातील १० शिक्षण संस्थांमध्ये ७९ शिक्षकांची बोगस भरती करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या पैकी ५१ शिक्षकांचं वेतन बंद करण्यात आले असून २८ शिक्षक कोर्टात गेल्याने या शिक्षकांचं प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. या घोटाळ्यातील प्रमुख अधिकारी मात्र मोकळेच फिरत आहेत. जिल्ह्यातील अनेक शाळा याच पद्धतीनं कार्यरत असून अनेक शिक्षक शासनाला फसवून पगार घेत असल्याची चर्चा असून अशा सर्वच शाळांची व शिक्षकांची चौकशी करण्याची मागणी आता शिक्षण तज्ञांकडून केली जात आहे.

या बाबत तक्रार करण्यात आली होती. पदाधिकारी, मुख्याध्यापक यांच्यासोबत संगनमत करून ही फसवणूक करण्यात आल्याचे प्राथमिक तक्रारीत म्हटले आहे. लेखाधिकारी उदय पंचभाई व राजमोहन शर्मा या दोघांनी पदाधिकारी आणि मुख्याध्यापक यांच्यासोबत संगनमत करून शिक्षकांची बोगस भरती केली आणि त्यांच्या नावावर शासनाकडून वेतन मंजूर करून घेतले असे प्राथमिक तक्रारीत म्हटले आहे. या प्रकारावरुन शिक्षण क्षेत्रातील एक मोठी फसवणूक समोर आली आहे.या घोटाळ्यामुळे शिक्षण क्षेत्रातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.