भुसावळ (प्रतिनिधी ) –
जिल्ह्यातील अनेक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापक आणि मुख्याध्यापक संघटनेचे काही नेते शिक्षकांना किरकोळ रजा, काही विशिष्ट कारणांसाठी मिळणारी विशेष रजा आणि अर्जित रजा याव्यतिरिक्त इतर कोणत्याच प्रकारची रजा देय नाही असे सांगून शिक्षकांची मुख्याध्यापकांची व संस्थाचालकांची दिशाभूल करीत आहेत असा आरोप जेष्ठ शिक्षक नेते व शिक्षण तज्ञ प्रहदलाल यांनी एका निवेदनाद्वारे केला आहे
याबाबत वस्तुस्थिती स्पष्ट करताना दलाल यांनी महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 मधील नियम क्रमांक 16 (13) याकडे लक्ष वेधले आहे शिक्षण कायद्यातच तरतूद असल्यामुळे त्यासाठी वेगळे परिपत्रक किंवा शासन आदेश यांची गरजच नाही असे सांगून दलाल यांनी स्पष्ट म्हटले आहे की उपरोक्त कायद्यातील तरतूद स्पष्टपणे अशी आहे की ज्याबाबतीत नियमानुसार अन्य कोणत्याही प्रकारची रजा अनुज्ञेय नसेल अशा विशेष बाबतीत किंवा ज्या बाबतीत अन्य रजा उपलब्ध असूनही कर्मचाऱ्याने असाधारण रजा मिळण्यासाठी लेखी अर्ज केला असेल तर त्या बाबतीत त्याला असाधारण रजा मंजूर करता येईल स्थायी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कोणत्याही एका वेळी असाधारण रजेचा कालावधी तीन वर्षांपेक्षा अधिक असणार नाही परंतु महाराष्ट्र शासन वित्त विभाग निर्णय क्रमांक अरजा/२४०२/२५ सेवा मंत्रालय मुंबई 32 दिनांक ७/१०/२००३ ह्या शासन oii आदेशा अन्वये शासकीय कर्मचाऱ्यांना असाधारण रजा पाच वर्षांपर्यंत घेता येते म्हणून शिक्षण संचालक यांचे पत्र क्रमांक अमाशा/३४/ विअर / क/शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे दिनांक सात जानेवारी 2003 च्या आदेशान्वये शासकीय कर्मचाऱ्यांना लागू असलेले पाच वर्षापर्यंतच्या असाधारण रजा घेण्याचा नियम शिक्षण विभागालाही लागू केलेला आहे याशिवाय क्षय कॅन्सर पक्षाघात इत्यादी काही गंभीर आजारांसाठी सुद्धा एक ते तीन वर्षांपर्यंत पगारासह विशेष रजा मंजूर करता येते शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनींनी या तरतुदीचा लाभ घ्यावा असे आवाहनही प्र. ह.दलाल यांनी केले आहे.



