भुसावळ ( प्रतिनिधी ) – प्रयागराज येथे आयोजित कुंभ मेळा 2025 दरम्यान प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने उडूपी ते टुंडला दरम्यान विशेष गाडी संचालन करण्याचा निर्णय घेतला आहे. गाडीचे तपशील पुढीलप्रमाणे आहेत –

कुंभ मेळा विशेष गाडी क्रमांक 01192 दिनांक 17.02.2025 रोजी उडूपी येथून 12:30 वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी 13:00 वाजता टुंडला येथे पोहोचेल.
कुंभ मेळा विशेष गाडी क्रमांक 01191 दिनांक 20.02.2025 रोजी टुंडला येथून 09:30 वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी 18:10 वाजता उडूपी येथे पोहोचेल.
थांबे: बरकूर, कुंदापुरा, मूकंबिका रोड, भटकळ, मुरडूरेश्वरा, कुमटा, गोकर्णा रोड, कारवार, मडगांव, रत्नागिरी, चिपळूण, रोहा, पनवेल, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, पिपरिया, मदन महाल, कटनी, सतना, मानिकपूर, प्रयागराज जंकशन, फतेहपूर, गोविंदपुरी, इटावाह.
कोच संरचना: 1 वातानुकूलित द्वितीय श्रेणी, 5 वातानुकूलित तृतीय श्रेणी, 10 शयनयान, 2 सामान्य द्वितीय श्रेणी, 2 लगेज-कम-गार्ड ब्रेक व्हॅन
या विशेष गाड्यांच्या विस्तृत वेळापत्रक व थांब्यांची माहिती जाणून घेण्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in वेबसाइटला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.


