हरिपूरा ता. यावल-सद्यस्थितीत वेगवेगळ्या स्वरूपाची आक्रमण आपल्या देश, धर्म, संस्कृतीवर होत आहेत,या आक्रमणांना समर्थपणे तोंड देणे ही संघ स्वयंसेवकांची जबाबदारी आहे .पुढील काळात जागरण, संस्कार ,आणि कुटुंब प्रबोधन या क्षेत्रात काम वाढवावे असा संदेश मा. भैय्याजी जोशी,अखिल भारतीय कार्यकारणी सदस्य, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी दिला. निमित्त होते स्नेहबंध या संघ कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे…. गोविज्ञान अनुसंधान व बहुउद्देशीय संस्था, हरिपुरा, तालुका यावल,अध्यक्ष मा. बापूरावजी मांडे यांचे प्रयत्नातून इच्छापूर्ती गोशाळेच्या प्रांगणामध्ये संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील 1975 ते 1990 या काळातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.. या कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक म्हणून मा.भैयाजी बोलत होते…
यावेळी व्यासपीठावर मा. शरद रावजी ढोले अखिल भारतीय प्रमुख धर्म जागरण, मा. श्री नाना जाधव मा. संघचालक पश्चिम प्रांत, महाराष्ट्र राज्य ,मा. श्री बाळासाहेब चौधरी , क्षेत्र कार्यवाह पश्चिम क्षेत्र , डॉ. विजय सोनी जिल्हा संघचालक भुसावळ जिल्हा मा.बापूराव मांडे आदी मान्यवर उपस्थित होते.. कार्यक्रमाच्या सुरुवातीला इच्छापूर्ती गोमाता मंदिराचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला, तदनंतर भारत माता पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले . त्यानंतर उपस्थित मान्यवर तसेच संघाचे आजी-माजी प्रचारक यांचा गोमातेची प्रतिमा, शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला

.कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यात संघाचे माजी जेष्ठ प्रचारक , जेष्ठ कार्यकर्ते, अधिकारी सर्वश्री बाळासाहेब चौधरी, रमेश बापू महाजन, भाऊराव पाटील,जगदीश ठाकूर,अरुण जोशी, शिवलकर सर,अशोक कांडेलकर, शशी दादा गाजरे इत्यादींनी गतकाळातील स्मृतींना आपल्या अनुभव कथनातून उजाळा दिला. या माजी कार्यकर्ता मेळाव्याच्या माध्यमातून जुन्या कार्यकर्त्यांना सवंगड्यांना भेटून हितगुज करण्याची संधी मिळाली याबद्दल बऱ्याच कार्यकर्त्यांनी आयोजकांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री बापूराव मांडे, सूत्रसंचालन श्री विनोद उबाळे यांनी तर आभार प्रदर्शन श्री सोनू मांडे यांनी व्यक्त केले कार्यक्रमास जिल्ह्याभरातून आणि जिल्हा बाहेरील साधारणता 250 कार्यकर्त्यांनी उपस्थिती दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गो शाळेच्या कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले.



