यावल –

हिंगोणा येथील जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेमध्ये अनुचित प्रकार घडला आहे. शाळेतील मुख्याध्यापिका विद्यार्थिनींना लज्जा वाटेल अशा वर्तणुकीत वागतात व विद्यार्थिनींना अतिशय खालच्या थरात मनात येईल त्याप्रमाणे शिवीगाळ करतात. हा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. याबाबत शाळेतील विद्यार्थ्यांनी बऱ्याच दिवसापासून तक्रार करून सुद्धा या विषयावर कोणत्याही प्रकारची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दखल घेण्यात आलेली नाही.
सदर मुख्याध्यापकांना स्थानिक ग्राम पंचायत प्रशासनाकडून सुद्धा बऱ्याच वेळा समज देण्यात आली, तरी पण मुख्याध्यापक मॅडमचा हेक्का काही कमी झाला असून त्यांची मुजोरी सुरूच आहे. अतिशय खालच्या थरात शिवीगाळ करत असल्यामुळे पालक संतप्त झाले आणि त्यांनी आज सकाळी शालेय व्यवस्थापन समिती, पालक वर्ग व गावातील ग्रामस्थ महिला यांनी जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेला कुलूप ठोकले.
अशा माथेफिरू मुख्याध्यापिकेवर कायदेशीर कारवाई करून यांची तात्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी पालकांनी केली आहे. शाळेतील विद्यार्थिनी व शिक्षण समिती अध्यक्ष व सर्व संचालक गावातील ग्रामस्थ महिला वर्ग यांनी आज जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेला अशा अनुचित प्रकार होत असून शाळेला कुलूप ठोकले.
हा प्रकार तात्काळ रावेर यावल विधानसभा क्षेत्राचे आमदार अमोल जावळे यांना फोनवरून गावातील ग्रामस्थांनी व पत्रकारांनी सांगितले असता आमदार साहेब यांनी तात्काळ शिक्षण अधिकारी जळगाव व गट शिक्षण अधिकारी यावल यांच्याशी फोनवरून संपर्क साधून त्यांनी तात्काळ हिंगोणा येथे जाऊन संबंधित मुख्याध्यापक शिक्षिकेवर शिक्षिकेवरती कार्यवाही करण्याचे सांगितले.
या शाळेत हा प्रकार गटशिक्षण अधिकारी धनके साहेब यांच्याकडे फोनवरून संपर्क केला असता यावल येथील गटशिक्षणाधिकारी धनके साहेब हे हिंगोणा येथे तात्काळ पोहोचले. विद्यार्थिनींनी व पालकांनी शिक्षण अधिकारी यांच्याकडे त्यांच्या व्यथा मांडल्या. लज्जा वाटेल असे बोलत असेल तर त्याची तात्काळ बदली करून यांच्यावर कारवाई करण्यात यावी.
पहिली ते चौथीच्या विद्यार्थिनींची दैनिक लोकशाही प्रतिनिधी रणजीत भालेराव यांनी संपर्क साधला असता त्या विद्यार्थिनींनी थेट सांगितले की, मुख्याध्यापिका आम्हाला लज्जा वाटेल अशा शिवीगाळ करीत आहेत. जोपर्यंत या मुख्याध्यापकांची बदली होत नाही तोपर्यंत आम्ही शाळेत जाणार नाहीत. अशा तीव्र शब्दांमध्ये पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी दैनिक लोकशाही प्रतिनिधीशी बोलताना संताप व्यक्त केला.
या प्रकरणात शिक्षण व्यवस्थापक समिती व गावातील ग्रामस्थ आणि महिला व पालक वर्ग यांच्या आलेल्या अर्जावरून गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके साहेब यांनी तातडीने निर्णय घेऊन सदर मुख्याध्यापकांची तात्पुरत्या स्वरूपाची बदली करण्याच्या निर्णय घेतला असून पुढील मुख्याध्यापक पदाचा चार्ज तात्पुरता स्वरूपाचा सपना सपकाळे यांच्याकडे देण्यात आला. या निर्णयामुळे पालक व विद्यार्थिनी यांच्यामध्ये जो अनुचित प्रकार झालेला होता त्यास पूर्णविराम मिळाला. त्या अनुषंगाने यावल येथील गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांनी शालेय व्यवस्थापन समिती व पालक तसेच गावातील ग्रामस्थ यांच्या वतीने शाळेचे कुलूप उघडले.


