मुक्ताईनगर – के्रडीट अॅक्सीस ग्रामीण लिमिटेड (ग्रामीण कोटा) चे वसुली अधिकारी कर्ज वसुली करून परतत असताना कुर्हा-मुक्ताईनगरदरम्यान पिंप्राळा फाट्याजवळ चौघांना रस्ता अडवत दमदाटी करीत मोबाईलसह 17 हजार 707 रुपयांची रोकड लूटली. ही घटना 29 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडली.

राहुल प्रसाद कदम (28, ह.मु.नंदनवन नगर, मलकापूर) यांच्या फिर्यादीनुसार ते वसुली अधिकारी असून 29 रोली वसुली करून परतत असताना त्यांना चौघांना अडवत मोबाईलसह रोकड हिसकावून पोबारा केला. तपास पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील करीत आहेत.


