अमरावती – मुंबई एक्स्प्रेस कायमस्वरूपी एक अतिरिक्त वातानुकूलित-द्वितीय आणि एक शयनयान डब्ब्यासह धावणार

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुविधांचा विचार करून अमरावती – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई (सीएसएमटी) एक्स्प्रेस (गाडी क्रमांक 12112/12111) मध्ये एक अतिरिक्त वातानुकूलित-द्वितीय श्रेणीचा (AC-II) डब्बा आणि एक अतिरिक्त शयनयान डब्बा कायमस्वरूपी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील खालीलप्रमाणे आहे:

गाडी क्रमांक 12112/12111 अमरावती – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई एक्सप्रेस

  • दि. १०.०२.२०२५ पासून अमरावती येथून
  • दि. ११.०२.२०२५ पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून

सदर गाडीची सुधारित संरचना खालीलप्रमाणे राहील:
१ प्रथम वातानुकूलित कम वातानुकूलित-द्वितीय, ३ वातानुकूलित-द्वितीय, ६ वातानुकूलित-तृतीय, ६ शयनयान, ४ जनरल सेकंड क्लाससह १ लगेज कम गार्डची ब्रेक व्हॅन, आणि १ जनरेटर कार.
एकूण गाडीच्या संरचनेत आता २२ डब्बे असतील, ज्यामुळे प्रवाशांना अधिक आरामदायक आणि सुलभ प्रवासाचा अनुभव मिळेल.

रेल्वे प्रशासन प्रवाशांना विनंती करते की, त्यांनी या नव्या सुविधेचा लाभ घ्यावा आणि ट्रेनमध्ये बसण्यापूर्वी त्यांच्या तिकिटांची स्थिती तपासावी.