वरणगाव – वरणगाव शहरातील तेली पंच कमेटीने शहरातील गट नंबर 842 मधील भूखंडामध्ये संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या नावाने सामाजिक वर सांसूत्रीक सभागृहासाठी निधी मिळावा यासाठी केंद्रीय क्रीडा राज्य मंत्री ना. रक्षा खडसे यांना निवेदनाद्वारे मागणी केली.

वरणगाव शहरातील समस्त तेली पंच कमेटीने ना. रक्षा खडसे यांची भेट घेऊन वरणगाव शहरातील गट नंबर 842 मधील खुल्या भूखंडात संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या नावाने सामाजिक वर सांसूत्रिक सभागृहाच्या बांधकामासाठी निधी मिळावा अशी मागणी केली आहे. यावेळी समाजाच्या नूतन कार्यकारणीतीचे अध्यक्ष – राजेश पंडित चौधरी,उपाध्यक्ष – मयूर चौधरी, राजेंद्र मधुकर चौधरी, तुषार चौधरी, दिलीप चौधरी, दिपक चौधरी, संदीप चौधरी, साईलाल चौधरी, महेश चौधरी, राहुल चौधरी, ऋषिकेश चौधरी यांची उपस्थिती होती. यावेळी ना. रक्षा खडसे यांनी समाज बांधवांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला. यामुळे समाज बांधवांमध्ये नवचेत्यन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.


