आदीशक्ती संत मुक्ताई नगर पंचक्राेशी परिक्रमेस उत्साहात प्रारंभ ;केंद्रिय राज्यमंत्री रक्षाताई खडसें व आ.पाटील यांची उपस्थिती

मुक्ताईनगर : आदीशक्ती श्री संत मुक्ताई नगर पंचक्राेशी परिक्रमेस आज सकाळी ९ वाजता केंद्रिय युवक कल्याण व क्रिडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री क्षेत्र मुक्ताई जुने मंदिर काेथळी येथुन पालखी काढीत प्रारंभ झाला.
या परिक्रमा प्रस्थानाप्रसंगी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांतभाऊ पाटील , संत मुक्ताई संस्थान अध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील, रविंद्र महाराज हरणे, उद्धव महाराज जुनारे यांच्यासह बहुसंख्येने वारकरी बांधवांची उपस्थिती हाेती.
दरम्यान या परिक्रमेचा पहिला मुक्काम उचंदे तर आज ३१ राेजी निमखेडी खु. व १ राेजी हरताळे येथे काल्याचे किर्तन करीत मुक्ताई जुने मंदिर काेथळी येथे महाप्रसादाने सांगता हाेईल.