भुसावळ – जिल्हा न्यायालय अंतर्गत विधी सेवा समिती भुसावळ शाखे अंतर्गत येथील श्री गाडगेबाबा हायस्कूल टिंबर मार्केट . येथे सोमवार 28 /1/2025 रोजी विद्यार्थ्याना मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्या निमित्त तसेच कायदेशीर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .

यावेळी विधी सेवा समितीच्या अँड. जास्वंदी भंडारी व अँड जयश्री देशमुख यांनी इयत्ता 5 वी ते 10 वी वर्ग विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांना भाषा संवर्धनासाठी उपयुक्त व महत्वपूर्ण असे मार्गदर्शन केले मराठी भाषा कशी समृद्ध झाली त्यामुळे आजही मराठीला राज्यभाषा व मातृभाषेचा दर्जा असल्याचे सांगून मराठी भाषेचे महत्व ,सांगितले तसेच बाल गुन्हेगारी व पोस्को कायदया बद्दल माहिती दिली . .

कार्यक्रमास मुख्याध्यापक के.आय.पाटील , आर.ए. लोनाग्रे , सौ.आर एस.पाटील , के.पी.तांबट ए .ए.पाटील , शिक्षिका सौ.पी.व्ही. मालुंजकर यांचेसह शिक्षक वृंद तसेच उज्वला बागुल , स्वाती भोळे , रुपाली नेवे उपस्थित होते . कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक के.आय.पाटील सर व शिक्षकवृंदाचे विशेष सहकार्य लाभले . यशस्वितेसाठी उज्वला बागुल स्वाती भोळे , यांनी सहकार्य केले .


