भुसावळ – मॉ साहेब जिजाऊ मराठा महिला मंडळाकडून राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . यावेळी प्रतिमा पुजन करून अभिवादन करत माँ साहेब जिजाऊ यांना मानाचा मुजरा करून त्रिवार अभिवादन करण्यात आले .
यावेळी ॲड जास्वंदी भंडारी (पाटील) यांनी राजमाता जिजाऊंचा आदर्श प्रत्येक भगिनींनी डोळ्यासमोर ठेवावा असे सांगून येत्या रविवारी मराठा महिला मंडळाकडून आयोजित हळदीकुंकू कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली व शहरातील सर्वं मराठा समाज भगिनींना या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन मंडळाच्या सर्व महिला कार्यकर्त्यांनी केले तसेच राजश्री शाहू प्रतिष्ठान यांनी जिजाऊ च्या लेकीचा सन्मान केला

या कार्यक्रमास सुरेखा ताई पाटील, मनोरमा ताई ओगले,ॲड जास्वंदी भंडारी (पाटील), महानंदाताई पाटील,अलका ताई भगत,प्रिती चौधरी, स्वाती पाटील, अनिता ठाकरे, रूपाली पाटणकर,दिपा पाटील, ललीता ताई चौधरी, डॉ छाया देशमुख, मनिषा ओगले तसेच समाजातील महिला बहुसंख्येने उपस्थित होते सर्व कार्यक्रमासाठी राजेश्री शाहु प्रतिष्ठान चे सहकार्य लाभले



