भुसावळ – गुरु चंद्रमणी बुद्ध विहार पंढरीनाथ नगर जामनेर रोड भुसावळ येथे माँ जिजाऊ जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली प्रमुख वक्त्या म्हणून डॉ. प्रा. सुधा खराटे या उपस्थित होत्या तर प्रमुख पाहुण्या डॉ छाया देशमुख , महानंदा पाटील, हर्षदा फेगडे ह्या उपस्थित होत्या.


कार्यक्रमाच्या प्रारंभी महापुरुषांना वंदन करून आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून तसेच राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात एका सुंदर गीताने एस एस केदारे व शुभांगी वानखेडे, अमिता सोनवणे यांनी केले त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले त्यात मॉर्निंग वॉकिंग ग्रुप, साई शंकर नगर योगा ग्रुप, महिला पतंजलि योगशिक्षिका , तसेच प्रा. संदानशीव सर, रिटायर्ड बी डी ओ आर पी तायडे, ज्येष्ठ पत्रकार संजय सिंग चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते रुपेश देशमुख त्यांचा सत्कार सावित्रीच्या लेकी ग्रुप तर्फे करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंदाकिनी केदारे यांनी केले
याप्रसंगी डॉ. प्रा . डॉ.सुधा खराटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना जिजाऊनी त्यांच्या जीवनात केलेला संघर्ष व संघर्षातून निर्माण केलेली अन्यायाविरुद्ध लढाई याबद्दल आपले विचार मांडले. तसेच डॉ. छाया देशमुख व महानंदा पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना जिजाऊ कशा घडल्या याबद्दल सविस्तर सांगितले तसेच हर्षदा फेगडे यांनी जिजाऊ नावाचा चा अर्थ काय आहे याबद्दल माहिती दिली. वर्षा ठाकरे, सुनिता तायडे यांनी जिजाऊ विषयीआपले मनोगत व्यक्त केले.जिजाऊंच्या जीवनावर शाल्मली केदारे आणि तेजस्विनी केदारे यांनी एकांकिका सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता रायपुरे यांनी केले तर आभार प्रदर्शन शीला गुरचळ यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सावित्रीच्या लेकी ग्रुप यांनी परिश्रम घेतले.



