भुसावळात श्री संताजी महिला मंडळाची स्थापना : अध्यक्षपदी सौ कविता चौधरी तर सचिवपदी उज्वला बागुल ; महिलांचा स्नेहमिलन कार्यक्रम संपन्न :

भुसावळ – आपण सुद्धा समाजाचे काही देणे लागतो ही बाब समाजातील महिलांनी जाणून आपणच पुढाकार घेऊन समाजातील महिलांची ,सामाजिक उन्नती, व प्रगती व्हावी महिलांचे आर्थिकदृष्टया सबलीकरण व्हावे याउदात्त हेतूने शुक्रवार दिनांक १० जानेवारी रोजी समाजातील महिलांनी एकत्र येऊन स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन केले . यावेळी भुसावळ श्रीसंताजी तेली समाज महिला मंडळा साठी सर्वानुमते कार्यकारिणी जाहीर करण्यात आली

शहरातील खडका रोड पाटील मळा येथील तेली भवन मध्ये आयोजित आयोजित स्नेह मिलन कार्यक्रमात खेळीमेळीच्या वातावरणात महिलांची कार्यकारिणी सन २०२५ ते २०२६ करीता जाहीर झाली . यात महिला अध्यक्षपदी माजी नगरसेविका सौ कविता अशोक चौधरी व सचिवपदी पत्रकार उज्वला बागुल यांची निवड करण्यात आली .

कार्यकारिणी याप्रमाणे – उपाध्यक्ष पदी सौ रेखा धुपे , सहसचिव सौ प्रतिभा चौधरी , कोषाध्यक्ष सौ भारती चौधरी , सल्लागार पदी डॉ वृषाली चौधरी तसेच कार्यकारिणी सदस्या सौ प्रियंका किरण चौधरी , सौ सुरेखा संजय चौधरी , सौ सविता गणेश सोनवणे ,सौ वैशाली सुनील चौधरी , सौ गायत्रीविजय चौधरी , सौ उज्वला गोपाळ चौधरी , सौ दिपाली चौधरी , सौ पुष्पां चौधरी सौ सुनीता पाटील , सौ ज्योती चौधरी , सौ रंजना चौधरी यांची निवड करण्यात आली . कार्यक्रमात मकर संक्रांतीनिमित्त महिलांचे हळदीकुंकू व विविध कार्यक्रमांबाबत चर्चा करण्यात आली .

यांची होती उपस्थिती

यावेळी सौ वर्षा चौधरी , सौ सुजाता अनिल चौधरी , रंजना चौधरी , शितल गणेश चौधरी , भारतीचौधरी , मनुश्री राहुल पाटील , मंदाबाई देवरे , मनीषा सोनवणे , उज्वला सोनवणे ,यशोदा चौधरी , मंगला चौधरी , शोभा चौधरी, सुनंदा प्रकाश पाटील , रेखा चौधरी, मनीषा चौधरी, आशा चौधरी , सोनाली पाटील यांचेसह सामाजातील महिला भगिनी मोठया संख्येने उपस्थित होत्या .