महानिर्मितीची अत्यावशक सेवा असतांना. दीपनगर परीसरातील कर्मचारी,अधिकारी यांच्या घरातील उपकरणे दुरुस्त केली जाणार नाही असा आदेश ; दीपनगर प्रशासनाचा तुघलकी फतवा

भुसावळ (प्रतिनिधी )-
देशात सर्वत्र कोरोनाचा कहर असतांना दीपनगर वीज प्रशासनाने वसाहत लॉक डाऊन व इतर गर्दी होणारे सर्व कार्यक्रम रद्द केले असले तरी उत्यावशक सेवा देवु असे लेखी अश्वासन दिले आहे किंबहुना दीपनगर वसाहतीत एखाद्या अधिकारी,कर्मचारी यांच्या घरातील उपकरणे अचानक बंद झाली तर विघुत परीरक्षण विभागातील कोणता ही ड्युटी वरील कर्मचारी दुरुस्ती करण्या साठी वसाहतीत घरी येणार नसच्याचा फतवा व्यवस्थापनाने काढल्याने परीसरात चिंतेचा विषय निर्माण झाला आहे. मुख्य म्हणजे येथील अधिकारी,कर्मचारी तीन्ही शिप्ट मध्ये काम करतात दुदैवाने तसे झाल्यास त्यांना बरेच दिवस अंधारात राहावे लागेल या सर्व प्रकारा मागे येथील हेकेखोर अधिकारी असल्याने अशा फतव्याचा संघटनांनी विरोध करणे गरजेचे आहे कारण महावितरण मधिल कर्मचारी ग्राहाकांची अशी तक्रार आल्यास तातडीने जावुन दरूस्त करत आहेत.
वास्तविक वसाहत लॉक केल्याने येथे येणे बंद झाले आहे.
शिवाय येथे कोणतीही व्यक्ती कोरोना ग्रस्थ क्युंवा संशयीत नाही.
दीपनगर व्यवस्थापनाने मास्क,सॅनेटाईझर अद्याप उपलब्ध करून दीलेली नाही ती सादने तातडीने उपलब्ध करुन द्यावीत. महाराष्ट्र शासनाच्या आदेशा नुसार किराणा दुकाने,दुध डेअरी,पिठाच्या गिरण्या,पंचरची दुकाने, ही उघडी ठेवली पाहीजेत अशी मांगणी कमगार नेते अरुण दामोदर, भरत पाटील, जितेंद्र वराडे यांनी महाराष्ट्र स्टेट ईलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन युनियन दीपनगर तर्फे केली आहे. कामगार नेते अरुण दामोदर,भरत पाटील, जितेंद्र वराडे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *