प्रसिद्ध गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन एक अलौकिक प्रतिभेचे धनी – प्रा .दिनेश पाटील

भालोद – ” आपल्या देशाला विविध क्षेत्रातील प्रतिभा वंतांचा समृद्ध असा वारसा लाभलेला आहे. गणितीय संशोधनात अतुलनीय योगदान दिलेले श्रीनिवास रामानुजन एक अलौकिक प्रतिभेचे धनी होते. त्यांचे गणितीय योगदान प्रचंड असून त्यांनी दिलेले सूत्र आजच्या आधुनिक गणितातील पद्धतीला जन्माला घालणारे आहे.” असे प्रतिपादन प्रा. दिनेश पाटील यांनी केले. भालोद येथील कला व विज्ञान महाविद्यालयातील गणित विभागाने श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य किशोर कोल्हे हे होते.
याप्रसंगी प्रसिद्ध गणितीय तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवन व संशोधनात्मक कार्यावर प्रा.दिनेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. एक कुटुंब व समाज व्यवस्थेचा बळी कसे ते ठरले याबद्दल त्यांनी विवेचन करून देशातील प्रतिभावंतांना त्या त्या वर्तमान काळातील समाज व्यवस्था समजून न घेता त्यांच्या मरणानंतर त्यांच्या कार्याला महत्त्व देते हे दुर्दैव आहे. आणि नेमके तेच दुर्दैव श्रीनिवास रामानुजन यांच्या बाबतीतही घडल्याचे त्यांनी सांगितले. याबद्दल बोलताना ते म्हणालेत की,” श्रीनिवास रामानुजन यांच्या गणितीय संशोधनातील महत्त्व तत्कालीन काळात इंग्लंडच्या केब्रीज विद्यापीठातील प्राध्यापकांच्या लक्षात आले. व त्यांनी त्यांचा या क्षेत्रात उपयोग करून घेतला. भारतात मात्र या दुर्दैवी प्रतिभावंताला कुटुंब आणि समाज व्यवस्थेने एक माणूस म्हणून समजून घेतले नाही. त्यांच्या गणितीय संशोधनातील अतुलनीय योगदानाला अभ्यासपूर्ण रीतीने समजून घेतले असते. तर श्रीनिवास रामानुजन हे दुर्दैवी प्रतिभावंत ठरले नसते.” असे ते म्हणाले .
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य कोल्हे सरांनी बुद्धकालीन शिक्षण पद्धतीत नवनवीन संशोधनाच्या अनेक वाटा आणि मार्गदीप होते. परकीय आक्रमणांनी आमच्या शैक्षणिक व संशोधनात्मक व्यवस्थेवर हल्ले करून ती व्यवस्था उध्वस्त करण्याचे प्रयत्न केले. परंतु तो शैक्षणिक वारसा मात्र पूर्ण ते मिटवू शकले नाहीत. त्याचेच उदाहरण श्री श्रीनिवास रामानुजन यांचे सांगता येईल. या देशात विचारवंतांची, संशोधकांची, विविध क्षेत्रातील अभ्यासकांची कमतरता नाही. कमतरता आहे ती त्यांना योग्य वातावरण न देण्याची व समाज व्यवस्थेने समजून एक विचारवंत माणूस म्हणून समजून न घेण्याची . या विचारवंतांना समजून न घेतल्यामुळे समाजाला व देशाला एका मोठ्या संशोधकाच्या ज्ञानापासून वंचित राहावे लागले . प्रतिभावंतांचा कुटुंब समाजाने देशाने नेहमीच सन्मान आणि आदर केला अशी प्रतिभावंत माणसे समाज आणि देशाची अलौकिक संपत्ती असतात.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन गणित विभागाचे प्रमुख प्रा.के .एस .पाटील यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ .अजय कोल्हे, डॉ.पद्माकर सावळे , डॉ .जतिन मेढे ,डॉ .के.जी . चौधरी , डॉ.आशुतोष वर्डीकर ,प्रा . डी.बी. चौधरी ,डॉ.वसंतराव पवार , डॉ.दिनेश महाजन ,डॉ.गणेश चौधरी,डॉ. दिगंबर खोब्रागडे ,प्रा . राकेश चौधरी ,प्रा .चंद्रकांत वानखेडे , प्रा .मीनाक्षी वाघुळदे ,प्रा .मोहिनी तायडे ,प्रा .गीतांजली चौधरी , प्रा .हेमलता कोल्हे , प्रा .फाल्गुनी राणे , प्रा.शैलजा इंगळे ,प्रा . भावना प्रजापती,प्रा . कोमल सावळे आणि शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.