भुसावळ – भुसावळ विधानसभा -महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.राजेश मानवतकर हे निवडणुकीच्या रिंगणात पूर्ण ताकदीने उतरले असून त्यांची लढत अपक्ष उमेदवार स्वाती जंगले यांच्यासोबत आहे.यामुळे भाजपा तिसऱ्या क्रमांकावर राहणार असल्याचा दावा माजी आमदार संतोष चौधरी यांनी पत्रकार परिषदेत केला .

,वरणगांव रोडवरील हॉटेल राधाकृष्ण येथे गुरुवार १४ नोव्हेंबर रोजी भुसावळ तालुक्यातील मुख्य कार्यकर्ते, पदाधिकारी यांची बैठक माजी आमदार संतोष चौधरी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.यावेळी माजी आमदार संतोष चौधरी यांनी बैठकीमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांचे विचार विनिमय करून कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या. तदनंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये माजी आ संतोष चौधरी यांनी पत्रकारांशी वार्तालाप करतांना सांगितले की , निवडणुकीमध्ये कार्यकर्ते हे महत्वाचे असतात यासाठी कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन विधानसभा निवडणुकीमध्ये कुठल्या उमेदवाराला मतदान करणार हे जाणून घेतले यासाठी कार्यकत्यांचे मतदान घेतले .यावेळी कार्यकर्त्यांनी सर्वानुमते डॉ.राजेश मानवतकर यांच्या नावाची पसंती केली व पाठिंबा दिला
.या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीमध्ये जात , पात , धर्म याचे राजकारण न करता तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रचंड मतांनी डॉ.राजेश मानवतकरांना निवडून द्या असे आवाहन केले . डॉ मानवतकर यांना निवडून आणण्यासाठी आपण संपूर्ण ताकदीने मैदानात उतरलो आहे.” विनाशकाले विपरीत बुद्धी असणाऱ्यांची बुद्धी भ्रष्ट झालेली असून मला लोकांची गरज नाही त्यांना माझी गरज आहे असे म्हणणाऱ्याचा माज उतरविण्याची वेळ आलेली आहे.” बाजी दोन दिवसात पलटते अजून तर सहा दिवस हातात असल्याची मिश्किल टीका यावेळी केली .
भुसावळ तालुक्यात खरी लढाई महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ.राजेश मानवतकर व अपक्ष उमेदवार स्वाती जंगले यांच्या मध्ये आहे. भाजपा भुसावळ विधानसभेत तिसऱ्या क्रमांकावर राहणार आहे.भुसावळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला जागा सुटल्याने एकमेकांना साथ देवून महाराष्ट्राला वाचवायचे आहे.यासाठी माजी आमदार संतोष चौधरी यांनी डॉ.राजेश मानवतकर यांना भुसावळ विधानसभेत निवडून आणण्याची संपूर्ण जबाबदारी युवा नेतृत्व जयेश संतोष चौधरी यांच्याकडे सोपविली असल्याचे सांगितले .
तालुक्यात गेल्या पंधरा वर्षात विकास फक्त जवळच्या चांडाळ चौकडीचा झालेला आहे.हे जनतेलाही चांगल्या प्रकारे ठाऊक आहे महाराष्ट्रात परिस्थिती भाजप विरोधात आहे गुजरातच्या निवडणुकीमध्ये यांनी दंगली घडवल्या होत्या.काही गुजराथी दरोडेखोर महाराष्ट्रासह भुसावळातही आलेले आहे. निवडणुकी दरम्यान दंगली घडवण्याची शक्यता नाकारता येत नाही अशां दरोडेखोरांपासून सावध राहा व लक्ष ठेवा.असा इशाराही या पत्रपरिषदेत दिला गुजराथी यांच्या नादी लागून महाराष्ट्राचा बट्टयाबोळ झाला असल्याचेही माजी आ चौधरी म्हणाले .



