भुसावळ –भुसावळसह उर्वरित जिल्ह्याला उत्तरेकडील यावल, रावेर तालुका व पुढे मध्य प्रदेशाला जाेडणारा भव्य पूल तापी नदीवरील सेतू म्हणून ओळखला जातो. या तापी नदीवर भव्य मोठा पूल असून त्या पू लावर दोन ते तीन फुटाचे कठडे लावण्यात आलेले आहे. या पुलावर प्रचंड रहदारी असते तसेच या पुलावर मॉर्निंग वॉक साठी तसेच संध्याकाळी सुद्धा शतपावली करण्यासाठी अबाल वृद्ध सगळेच या पूलावर फिरत असतात . या पुलावरील कठड्यांजवळ युवक युवती नागरिक कित्येक वेळा एक एक दोन दोन तास एकाच ठिकाणी उभे राहून गप्पा मारताना हिंडताना दिसतात तसेच सेल्फी सुद्धा काढतात. आणि या पुलावरील या लहानशा कठड्यांमुळे आजपर्यंत सातत्याने अनेकांनी तापी नदीमध्ये उडी मारून आत्महत्या केल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे त्याचे प्रमाण वाढत आहे. तसेच बऱ्याचदा या पुलावरअपघात सुद्धा होतात. त्यातल्या त्यात नुकतीच आता शेळगाव बॅरेज पूर्ण झाल्यामुळे त्याचा बॅकवॉटर मुळे तापी नदीत पाण्याची पातळी वाढलेली आहे. त्यामुळे अनेकदा आत्महत्या करणाऱ्यांना उडी मारणाऱ्यांना जीव वाचवण्यासाठी वेळ मिळत नाही. म्हणून महोदय आपणास नम्र विनंती आहे की आपण तापी नदीवरील पुलावरून आत्महत्या रोखण्यासाठी त्वरित युद्ध पातळीवर तापी नदीच्या पुलावरील दोघं बाजूंच्या कठड्यांजवळ किमान बारा फूट उंचीचे सुरक्षा जाळ्या लावून . त्या ठिकाणी होणाऱ्या आत्महत्या रोखण्यास मदत होईल. जे समाज हितासाठी अत्यंत आवश्यक आहे. तसेच त्या सुरक्षा जाड्यांमध्ये सुशोभीकरणासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी विविध शोभिवंत फुलांच्या, झाडांच्या कुंड्या यांची तातडीने व्यवस्था सुद्धा व्हावी. असे विनंती पत्र सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी राज्याचे मुख्य सचिव, तथा जलसंपदा सचिव , जिल्हाधिकारी जळगाव, तापी पाटबंधारे विकास महामंडळ यांना पाठविले असल्याचे एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविलेले आहे .



