शेतकरी संघटनेने मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांना दिले विविध मागण्यांचे निवेदन –

यावल –
स्व.शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य क्रांती मोर्चा काढून आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी जळगाव व जिल्हा कृषी अधिकारी यांना निवेदन दिले.
निवेदनात नमूद आहे की
जळगांव जिल्ह्यातून ठिबक व तुषार संच अनुदान,पिकविमा,अतिवृष्टी, कर्जमाफी, नारपार नदीजोड प्रकल्प.शेतकी संघटनेच्या व शेतकऱ्यांच्या मागण्या खालील प्रमाणे.
जळगांव जिल्ह्यातून सन २०२३- २४ या वर्षातील ठिबक व तुषार संच
३२४०२ शेतकरी लाभार्थ्यांचे १८८ कोटी रुपये थकीत सबसिडी त्वरीत
शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी. जळगांव जिल्ह्यात सन २०२३ २४ मध्ये झालेल्या अतिवृष्टी,गारपीट,अवकाळीचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे थकीत अनुदान बँक खात्यावर जमा
करावे, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचा लाभ द्यावा,ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीकडे शेतकऱ्यांनी घेतलेला पीक विम्याचा लाभ जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना मिळावा.नारपार नदीजोड प्रकल्पास चालना देवून प्रकल्प त्वरीत सुरु करावा.वरील शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या मागण्या जिल्हाअधिक्षक
कृषिअधिकारी यांनी शासनाकडे पाठपुरावा करुन पूर्ण कराव्या .