निसर्गाशी नाळ जोडून जैवविविधतेप्रमाणे जाती, परंपरा, धर्म यातील विविधतेत मध्ये एकात्मता जोपासणे गरजेचे” -प्रा. डॉ. आर एस नाडेकर


भुसावळ – भुसावळ कला विज्ञान आणि पूनमचंद ओंकारदास नाहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ मध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभाग व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज जागतिक आदिवासी दिन तथा क्रांती दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील यांनी भूषवले तर कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आर. एस. नाडेकर हे होते.

बिरसा मुंढा यांच्या प्रतिमेची पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. डॉ.आर एस. नाडेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपले पूर्वज कसे निसर्ग पूजक होते याचे विविध सणांची उदाहरणे देऊन त्यातून भारतीयांची निसर्गप्रियता व्यक्त केली. नागपंचमी, पोळा, दिवाळी आणि दसरा या सर्व सणांमध्ये निसर्गाला मध्यवर्ती स्थान दिलेले आहे. त्यामुळे निसर्ग व पर्यावरण यांच्या संवर्धनातूनच मानवी विकासाला संपन्नता येईल असे मत नमूद करून तरुणांनी निसर्गाकडून विविधतेतून एकता हा संदेश घेणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी प्रतिपादित केले. याप्रसंगी निसर्ग संवर्धन तथा स्वातंत्र्यलढ्यातील आदिवासी बांधवांचे योगदानावर देखील त्यांनी प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. एस. व्ही. पाटील यांनी महाविद्यालय स्तरावर विविध समित्याच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होत असतो हे नमूद करून आदिवासी दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विलास महिरे यांनी केले तर कार्यक्रमाची सूत्रसंचालन प्रा.विलास सोळुंके यांनी केले.आभार प्रदर्शन प्रा. संगीता भिरुड यांनी केले. याप्रसंगी डॉ. जे. एफ. पाटील, डॉ.पी.ए.अहिरे, प्रा. डी. एन. पाटील, डॉ. प्रफुल्ल इंगोले, प्रा.अक्षरा साबळे, प्रा. एस. डी. अडकमोल उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी स्वयंसेवक तथा स्वयंसेविका यांनी सहकार्य केले.