भुसावळ – यूजीसीच्या रेगुलेशनशी विसंगत कायदा असू शकत नाही वेळोवेळी उच्च न्यायालयाने देखील दखल घेऊन निर्णय दिलेले आहेत असे असतानाही महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी जीआर काढून यूजीसीच्या नियमांमध्ये बदल केलेले आहेत नियमांची पायमल्ली केलेली आहे याच्या विरोधात महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाचे आदेशान्वये एन. मुक्टो संघटनेने तीव्र आंदोलनाचा पवित्र उचललेला आहे यूजीसीच्या नियमाप्रमाणे सर्वच महाविद्यालयातील एकूण प्राध्यापकांपैकी 90% प्राध्यापक रेगुलर असले पाहिजे आणि केवळ 10% प्राध्यापक सीएचबी धारक असले पाहिजे असा नियम असतानाही महाराष्ट्रात नियमित प्राध्यापकांपेक्षा सीएचबी प्राध्यापकांची संख्या अधिक आहे बऱ्याच वेळा उच्च शिक्षण क्षेत्रात काम करणारे अधिकारी मंत्री मंडळाच्या निर्णयाला मानत नाही युजीसीचा नियम मानत नाही राज्यपालांनी आदेश काढले तरी त्या संदर्भात निर्णय घेतले जात नाही अशा उच्च शिक्षण क्षेत्रातील काम करणारे अधिकारी संविधानाचा वापर करीत नाही त्यांच्यावर कडक कार्यवाही होऊन प्राध्यापकांच्या न्याय मागण्या महाराष्ट्र शासनाने पूर्ण कराव्या यासाठी प्राध्यापक रस्त्यावर उतरले आहेत या संदर्भात आज भुसावळ येथील कला, विज्ञान आणि पू. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात परिसरातील प्राध्यापकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या मेळाव्यात केंद्रीय कार्यकारिणीचे अध्यक्ष प्रा. नितीन बाविस्कर प्रा. एकनाथ नेहेते केंद्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष डॉ के जी कोल्हे, सचिव डॉ. ए.डी.गोस्वामी, सहसचिव विजय सोनजे, स्थानिक शाखेचे अध्यक्ष प्रा दीपक पाटील व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी प्रा. नितीन बाविस्कर यांनी मेळाव्याचे अध्यक्षस्थान भूषवून अध्यक्षीय समारोप केला. त्यात त्यांनी १६ ऑगष्ट रोजी विद्यापीठावर आयोजित केलेल्या आंदोलनात बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन केले. प्रा.एकनाथ नेहेते यांनी आंदोलनाची भूमिका सभागृहासमोर मांडली. त्यात जोपर्यंत आपण आपली ताकद दाखवत नाही तोपर्यंत शासन आपल्या मागण्या मंजूर करणार नाही. एनईपी आणि वर्कलोड संदर्भात भूमिका मांडली. त्यानंतर प्रा डॉ अनिल पाटील यांनी संघटनेचा इतिहास मांडून संघटना कोणत्या जातीपातीची नसून प्राध्यापक ही संघटनेची जात आहे अशी भूमिका विशद केली. आंदोलनाचे सूत्रसंचालन प्रा दीपक पाटील यांनी तर आभारप्रदर्शन डॉ किरण वारके यांनी मानले . त्यानंतर दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी विद्यापीठावर भव्य दिव्य मोर्चाचे आयोजन केलेले आहे या मोर्चात बहुतांश प्राध्यापकांनी सहभागी व्हावे असे आव्हान करण्यात आले मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी स्थानिक शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले मेळाव्यास परिसरातील शंभर प्राध्यापक उपस्थित होते




