तलवारीच्या धाकावर दहशत माजविणाऱ्याला अटक; नशिराबाद पोलीसांची कारवाई :

भुसावळ- नशिराबाद शहरातील पिंजारी हॉलजळज जवळ बेकायदेशीरपणे हातात तलवार घेवून परिसराYत दहशत माजविणाऱ्या संशयित आरोपीला नशिराबाद पोलीसांनी शनिवारी २७ जुलै रोजी दुपारी साडेचार वाजता कारवाई करत अटक केली. त्याच्याकडून लोखंडी तलवार जप्‍त करण्यात आली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अत्ता उल्लाह अमान उल्लाह शाह वय २९ रा. मोमीन मोहल्ला, नशिराबाद असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावातील पिंजारी हॉल परिसरात उत्ता उल्लाह अमान उल्लाह शहा हा तरूण बेकायदेशीररित्या हातात तलवार घेवून दहशत माजवित असल्याची गोपनिय माहिती नशिराबाद पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी शनिवारी २७ जुलै रोजी दुपारी साडेचार वाजता कारवाई करत संशयित आरोपी अत्ता उल्लाह अमान उल्लाह शाह वय २९ रा. मोमीन मोहल्ला, नशिराबाद याला अटक केली. त्यांच्याकडून लोखंडी तलवार हस्तगत केली आहे. याप्रकरणी पो.कॉ.तौसिफ पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ योगेश वराडे हे करीत आहे.