सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांच्या सुविधांवर रेल्वेचे लक्ष : कोचचे उत्पादन वाढले

२०२४ आणि २०२५ दरम्यान रेल्वेने १०००० विना- वातानुकूलित कोचचे उत्पादन केले

नवी दिल्ली,

सामान्य प्रवाशांचे जीवन सुलभ करण्यासाठी, भारतीय रेल्वेने पुढील दोन वर्षांसाठी सुमारे १०,००० विना- वातानुकूलित डब्यांच्या निर्मितीची योजना आखली आहे. अधिकाऱ्यांच्या मते, आर्थिक वर्ष २०२४-२५ आणि २०२५-२६ मध्ये, ५३०० पेक्षा जास्त सामान्य डब्यांसह सुमारे १०००० कोच अंतिम केले जात आहेत.

आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये, रेल्वेने अमृत भारत सामान्य कोचसह २६०५ सामान्य श्रेणींचे डबे, अमृत भारत शयनयान कोचसह १४७० विना- वातानुकूलित शयनयान, अमृत भारत एस एल आर डब्यांसह ३२३ एसएलआर कोच, ३२ उच्च क्षमतेची पार्सल व्हॅन आणि ५५ आसनी डब्बे तयार करण्याची योजना आखली आहे.

आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये, रेल्वेने अमृत भारत सामान्य डब्यांसह २७१० सामान्य कोच, अमृत भारत शयनयान कोचसह १९१० विना- वातानुकूलित शयनयान, अमृत भारत एसएलआर डब्यांसह ५१४ एसएलआर कोच, २०० उच्च क्षमतेची पार्सल व्हॅन आणि २०० पॅन्री व्हॅन आणि कार तयार करण्याची योजना आखली आहे.
रेल्वे सेवेची मागणी गतिमान आहे आणि हंगामी फरक, प्रवासी वाहतूक वाढ, इत्यादींवर अवलंबून घटते/वाढते, त्यामुळे डब्यांची आवश्यकता या घटकांवर आधारित आहे आणि त्यामुळे ते वार्षिक कोच उत्पादन कार्यक्रमात समाविष्ट करण्यात येते. तसेच कोचचे उत्पादन हे सामान्यत: आवश्यकतेनुसार असते.